आपल्या शरीरातील एक अविभाज्य अवयव म्हणजे डोळे. मात्र त्याचं डोळ्यात कोणी आश्रय घेऊन राहात असेल तर? मुंबईतील घाटकोपर परिसरात अत्यंत दुर्मीळ प्रकरण समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीच्या डोळ्यात चक्क 10 सेंटीमीटर इतका लांब किडा आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये हा किडा बऱ्याच काळापासून होता. सुदैवाने या किड्याला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मच्छरमुळे झाला किडा?
घाटकोपरमध्ये राहणाऱ्या शिवकुमार नेहमी प्रमाणे सकाळी चालण्यासाठी गेले होते. घरी परत आल्यावर त्याच्या डोळ्यात त्रास जाणवू लागल्याने त्यांने आय ड्रॉप्स टाकले. मात्र डोळा आणखी लाल झाल्याने त्यांनी थेट आय स्पेशालिस्ट गाठलं. तेव्हा डॉ. देवांशी शहा यांना त्यांच्या डोळ्यात काही हालचाल दिसली आणि तेव्हा आढळून आलं की यांच्या डोळ्यात एक किडा आहे. धक्कादायक म्हणजे जो किडा शिवकुमार यांच्या डोळ्यात होता त्याच्या पोटात अंडी होती. इतकी जोखमीची सर्जरी करणं किती अवघड आहे, याचा अंदाज डॉक्टरांना देखील आला. मात्र हा किडा एका मच्छरमुळे आत तयार झाल्याचा दावा देखील डॉक्टरांनी केला आहे.
नक्की वाचा - SSC Result : ऑक्सिजन सपोर्टनं पेपर दिले, दुर्मीळ आजारावर मात करत कल्याणच्या माहीचं दहावीत दणदणीत यश
या व्यक्तीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर देवांशी शाह यांनी सांगितलं की, ही अत्यंत दुर्मीळ केस आहे. अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया करणं अवघड असतं. डोळ्यातून किडा काढताना तो तुटण्याची, मरण्याची शक्यता असते. असं झाल्यास रुग्णाचा धोका वाढतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना अधिक काळजी घ्यावी लाहते.