कुणबी नोंदी सापडलेल्या मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण द्या; मनोज जरांगेंची नवीन मागणी

कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की, मुस्लीम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं. त्यांच्यात जाती नाहीत, त्यांच्यात सामाजिक स्तर नाही.

Advertisement
Read Time: 2 mins

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक नवा डाव टाकला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुस्लिमांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यामुळे या सर्व मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या या मागणीने राज्याच्या राजकारणात आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सरकारने मनोज जरांगे यांचं आंदोलन मिटवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी मनोज जरांगेंनी सरकारवर नवा डाव टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. आता देखील असाच प्रयत्न मनोज जरांगेंनी केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कुणबी मुस्लिमांच्या नोंदी सापडत आहे, त्यामुळे त्यांना देखील आता ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी केली.

(नक्की वाचा - भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?)

मनोज जरांगे पाटील एवढ्यावर थांबले नाही, तर शेतकरी नेते पाशा पटेल यांची देखील कुणबी नोंद सापडली आहे. जर त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळत असेल, तर राज्यातील इतर मुस्लिमांना ते आरक्षण का मिळू नये? असा प्रश्न देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.

कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मुस्लिमांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं की, मुस्लीम समाजाकडे धर्म म्हणून पाहिलं जातं. त्यांच्यात जाती नाहीत, त्यांच्यात सामाजिक स्तर नाही.

Advertisement

(नक्की वाचा- आमदाराच्या पुतण्याचा प्रताप, दोघांना चिरडले,अपघातानंतर आमदार म्हणतात...)

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी करून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करणाऱ्या सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाचा मुद्दा कसा हाताळणार हे देखीला पाहणे औत्सुक्याचे आहे.

Topics mentioned in this article