भास्कर जाधव आणि रामदास कदम हे राजकारणातले एकमेकांचे हाडवैरी. भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांचा गुहागर मधून पराभव केला. त्यानंतर तर हा वाद आणखीन वाढला. दोघेही एकमेकांना पाण्यात पाहातात. एकमेकांवर टिका करण्याची संधी ते सोडत नाहीत. भास्कर जाधव आणि रामदास कदम हे मुळचे शिवसैनिक. पण नंतर भास्कर जाधव राष्ट्रवादीत गेलेनंतर पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला. तर रामदास कदम हे शिंदें बरोबर गेले. पण या दोघांतील वैर आजही कायम आहे. रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यात त्यांनी भाजप शिवसेना शिंदे गटाला कसे संपवू पाहात आहे हे सांगितले होते.यावरूनच भास्कर जाधव यांनी कदम यांची फिरकी घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्रेंडिंग बातमी - महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले
भास्कर जाधवांच्या शुभेच्छा का?
शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना उपहासात्मक टोले लगावत शुभेच्छा दिल्या आहेत. रामदास कदम यांना धन्यवाद दिले पाहिजेत. रामदासभाई सारखा निर्भीड नेता आज महायुतीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी भाजपचं पाप उघडपणे मांडण्याचं धाडस दाखवलं आहे. असे भास्कर जाधव म्हणाले. एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व कसं तकलादू आहे. हेच आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले आहे असे जाधव म्हणाले. शिवाय त्यांनी आपल्या निवडून आलेल्या लोकसभेच्या जागा कश्या सोडल्या. भाजपने त्यांचे उमेदवार दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले. मात्र एकनाथ शिंदे यांचे उमेदवार जाहीर करण्यास उशीर लावला. त्यामुळे पराभव झाला. हे सांगण्याचे धाडस रामदास कदम यांनी केले. त्यांनी असेच बोलत रहावे यासाठी त्यांना शुभेच्छा देतो असे भास्कर जाधव उपहासाने म्हणाले. कदम यांनी अजित पवारांबाबतही वक्तव्य केले होते. त्याचाही समाचार जाधव यांनी घेतला. शिवाय या पुढेही भाजप, शिवसेना शिंदे आणि अजित पवारांवर असेच बोलत रहा. त्यासाठी शुभेच्छा देतो असेही जाधव म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - शिवसेना- भाजप वाद पेटला? कदमांच्या आरोपांना भाजपचे थेट उत्तर
काय म्हणाले होते रामदास कदम?
रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत कटू अनुभव आल्याचे रामदास कदम म्हणाले. शिवसेना भाजपची युती जवळपास 30 वर्षाची आहे. त्यामुळे सर्व काही तुम्हालाच समजते आणि आम्हाला काहीच समजत नाही असे समजू नका असा इशाराही कदम यांनी दिला होता. लोकसभेसाठी शिवसेनेला 15 जागा देण्यात आल्या. त्याही शेवटपर्यंत लटकवून ठेवण्यात आल्या. प्रत्येक जागेवर भाजपनेच हक्क सांगितला. त्याचा फटका शिवसेनेला बसला. जर या जागा वेळीच जाहीर झाल्या असत्या तर शिवसेनेनं 12 ते 13 जागा जिंकल्या असत्या. भाजपने आडकाठी आणल्यामुळे या जागा हरल्या असा थेट आरोप कदम यांनी केला होता. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या स्वभावाचा गैरफायदा भाजपने घेतला असा आरोपही त्यांनी केला होता. भाजपच्या लोकांनीच मोदीं बरोबर महाराष्ट्रात घात केला असेही ते म्हणाले. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत 100 जागा शिंदे गटाला मिळाल्याच पाहीजेत असेही ते म्हणाले होते.
भाजपचं उत्तर काय?
रामदास कदम यांच्या आरोपांना भाजपने जोरदार उत्तर दिले होते. रामदास कदम हे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी जाहीर पणे असे वक्तव्य करणे योग्य नाही असे भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले. त्यांनी असे बोलणे टालले पाहीजे जेणे करून दोन्ही पक्षात वितुष्ठ निर्माण होईल. आता जर उणीधुणी काढत कोणी बसले तर ते योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले. त्यांच्या काही तक्रारी असतील तर बैठकीत त्या गोष्टी बोलल्या पाहीजेत असेही ते म्हणाले. त्यांनी जे काय आरोप केले आहेत ते आश्चर्यकारक असल्याचेही दरेकर म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world