जाहिरात
Story ProgressBack

आमदाराच्या पुतण्याचा प्रताप, दोघांना चिरडले,अपघातानंतर आमदार म्हणतात...

पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते यांनी हा अपघात केला आहे.

Read Time: 2 mins
आमदाराच्या पुतण्याचा प्रताप, दोघांना चिरडले,अपघातानंतर आमदार म्हणतात...
पुणे:

पुण्यातल्या पोर्शे कार अपघाताची घटना ताजीच असताना आता आणखी एक अपघात पुण्यात झालाय. या अपघातात आमदाराच्या पुतण्यानेच दोघांना आपल्या कार खाली चिरडले आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते यांनी हा अपघात केला आहे. त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात कळंब जवळ झाला आहे. अपघाता वेळी मयूर मोहिते हा कार चालवत होता. त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार टक्क दिली. यात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. ही धकड इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. 

ट्रेंडिंग बातमी - भास्कर जाधवांच्या रामदास कदमांना शुभेच्छा, अलगद चिमटे काढले,नक्की काय घडलं?

मयूर हा पुण्याच्या दिशेने चालला होता. त्यावेळी त्याच्या समोर टु व्हीलर आली. त्यालाच त्याने धडक दिली. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी हा अपघात झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात कारवाई केलीय. दरम्यान या प्रकरणानंतर आमदार दिलीप मोहित समोर आले आहेत. त्यांनी पुतण्याची बाजू घेत त्याने कोणत्याही प्रकारचे मद्य सेवन केले नव्हते असे सांगितले. शिवाय अपघातानंतर तो पळूनही गेला नाही हे ही त्यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - महायुतीत ठिणगी? रामदास कदम भडकले, भाजपला झाप-झाप झापले

मयूर मोहिते हा  पेशानं इंजिनियर आहे. मयूर सध्या डेव्हलपिंग अॅण्ड इंडस्ट्रीयल सप्लायर्स व्यवसाय सांभाळतो. जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास मयूर मोहिते इच्छुक होता. आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचे यांचे मोठे बंधू साहेबराव मोहितेंचा तो मुलगा आहे. मयूरही राजकारणात येण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने ते तयारीही करत आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Mumbai Rain : आला रे आला, मुंबईकरांची प्रतीक्षा संपली; पुढील 4 दिवस पावसाचा जोर
आमदाराच्या पुतण्याचा प्रताप, दोघांना चिरडले,अपघातानंतर आमदार म्हणतात...
ST bus accident on pune solapur highway bus hit to tree 20-22 people injured
Next Article
पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसची झाडाला धडक, बसचा चक्काचूर; 20 ते 22 प्रवासी जखमी
;