Konkan News : कोकणात फिरायला जाताय? आपत्ती व्यवस्थापनाने केलंय अलर्ट, या चुका अजिबात करू नका

पुढील काही दिवसात कोकणात जाणार असाल तर खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Konkan Tourism : कोकण हे अनेकांना आवडतं पर्यटनाचं ठिकाण. कोकणातील समुद्रात मनसोक्त भिजणं आणि खेळणं हा अनेकांसाठी आवडता छंद. पुढील काही दिवसात कोकणात जाणार असाल तर खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत देण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ फेब्रुवारी २०२६ रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे.  त्यानंतर २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दाट धुके पसरलेले आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर धुक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी पुढील प्रमाणे खबरदारीच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत प्रसारित करण्यात येत आहेत.

धुकं म्हणजे काय?

पाणी आणि बर्फाचे अत्यंत सुक्ष्मकण हवेमध्ये तरंगत असल्यामुळे दृश्यमानता कमी होते. किमान १ किलोमीटरवरील दृश्य न पाहता येण्यासारखी स्थिती म्हणजे धुकं होय. तर साधारणतः २०० ते ५०० मीटर अंतरावरील दृश्य न दिसण्यास मध्यम (Moderate) प्रकारची धुकं म्हणतात. ५० ते २०० मीटर अंतरावरील दृश्य न दिसण्यास दाट (Dense) प्रकारची धुकं असतात. तर ५० मीटर पेक्षा कमी अंतरावरील दृश्य न दिसण्यास घनदाट (Very Dense) प्रकारची धुकं असतात. 

काय दक्षता घ्याल?

प्रवासादरम्यान मुख्य रस्त्यावर वाहन उभे करू नये. वाहन थांबविल्यास फॉग लाईट/पार्किंग लाईट सुरू ठेवून इतरांना स्पष्ट दिसेल याची खात्री करावी. वाहन चालविणे कठीण झाल्यास रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे थांबून इंडिकेटर (हॅझर्ड लाईट) सुरू ठेवावा. डिफॉस्टर आणि विडस्क्रीन वायपरचा वापर करा. फॉग लाईट किंवा लो-बीम हेडलाईटचा वापर अनिवार्यपणे करावा. पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवावे व नियंत्रित वेगात वाहन चालवावे. अचानक ब्रेक लागण्याच्या परिस्थितीसाठी सतर्क राहावे. अनावश्यक ओव्हरटेकिंग टाळावे आणि लेन शिस्त काटेकोरपणे पाळावी. सर्व वाहतूक नियमांचे पूर्ण पालन करावे.

नक्की वाचा - Maharashtra Village : गाव असावं तर अस्सं! कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर, राज्य सरकारकडून मोठा सन्मान

वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर किंवा इतर विचलित करणाऱ्या कृती टाळाव्यात. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे आणि चारचाकी चालकांनी सीट बेल्ट लावावा. रस्त्यावरील चिन्हे व सूचना फलकांचे पालन करून सावधगिरीने वाहन चालवावे. पहाटे आणि उशिरा रात्री प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी. सार्वजनिक वाहतूक वाहन, ट्रॅक्टर-ट्रॉली, शाळा वाहने व जड वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह टेप लावण सुनिश्चित करावे. डावीकडे किंवा उजवीकडे वळताना इंडिकेटरचा वापर करावा. जड वाहन चालकांनी वाहनाच्या बाहेर माल लोंबकळेल अशा पद्धतीने वाहतूक करू नये. ओल्या रस्त्यावर सावकाश वाहन चालवा. कृषी विद्यापीठाकडून प्रसारित केल्या जाणाऱ्या कृषी सल्ल्याला अनुसरून शेतकऱ्यांनी पिकांची व फळबागांची काळजी घ्यावी. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.umd.gov.in  या संकेतस्थळावरून घ्या.

Advertisement

अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२/२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे.