गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे. गावपातळीवरील जीवनमान सुधारण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवा, शेती यासह स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19, सन 2019-20, सन 2020-21, सन 2021-22, सन 2022-23 अंतर्गत विभागस्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा आणि विशेष पुरस्कार देण्यात आला. राज्यातील सहा ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात येणार आहे.
कोकणातील ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक...
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2018-19 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत हुमरस, ता. कुडाळ यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत आयनोडे हेवाळे ता. दोडामार्ग यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत बापर्डे तालुका देवगड प्रथम तर ग्रामपंचायत परुळेबाजार वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
या सहा ग्रामपंचायतीचा सन्मान 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता सिडको कार्यालय सभागृह, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीचा सन्मान होणार आहे. अशी माहिती (पाणी व स्वच्छता) विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अंजिक्य सावंत यांनी दिली आहे.
सन 2020-21 व 2021-22 या कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत ग्रामपंचायत निरवडे ता. सावंतवाडी यांनी प्रथम क्रमांक तर ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. पुरस्कार विजेत्या सर्व ग्रामपंचायतीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता सिडको कार्यालय सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, बेलापुर, नवी मुंबई विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world