जाहिरात

Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचे भाव कडाडले, जाणून घ्या नवे दर

भीषण युद्धाचा जगभरात फटका बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम सोन्या- चांदीच्या भावावर झाला आहे.

Gold Silver Price Today: इराण- इस्त्रायल युद्धाचा भडका, सोन्या-चांदीचे भाव कडाडले, जाणून घ्या नवे दर

मंगेश जोशी, जळगाव:

Gold Silver Price Today: अमेरिका इराण इस्त्रायलमध्ये भीषण युद्धाचा वणवा पेटला आहे. अमेरिका इस्त्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर इराणकडूनही प्रतिहल्ले करण्यात येत आहेत. या भीषण युद्धाचा जगभरात फटका बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा सर्वात मोठा परिणाम सोन्या- चांदीच्या भावावर झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात तब्बल 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे तर दोन दिवसात सोन्याचे भाव 22 हजार रुपयांनी वाढले आहे.

युद्धाचा फटका, सोने-चांदीचे दर कडाडले!

अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली आहे. परिणामी, जळगावमध्ये सोन्याच्या दराने आज ऐतिहासिक उसळी घेतली असून, अवघ्या दोन दिवसांत सोन्याचे भाव २२ हजार रुपयांनी वधारले आहेत. ​आज एकाच दिवसात सोन्याच्या भावात तब्बल १२ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. 

Vasai News: कार्यालयात बोलावलं, बविआच्या कार्यकर्त्याला वळ उठेपर्यंत मारलं; भाजप नगरसेवकावर गुन्हा

यामुळे शुद्ध सोन्याचा भाव १ लाख ८२ हजार रुपयांवर पोहोचला असून, जीएसटीसह हा आकडा १ लाख ८७ हजार ४६० रुपयांवर गेला आहे. केवळ सोनेच नव्हे, तर चांदीनेही आज सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चांदीच्या दरात एका दिवसात ७ हजार रुपयांची वाढ होऊन तो ३ लाख रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला आहे. करांसह (GST) चांदीसाठी आता ग्राहकांना ३ लाख ९ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

सोन्याचा भाव 2 लाखांवर जाणार..? 

​सराफा बाजारातील जाणकारांच्या मते, जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेली अशांतता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण यामुळे सोन्याकडे 'सेफ हेवन' म्हणून पाहिले जात आहे. मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केल्याने ही दरवाढ झाली आहे. आगामी काही दिवसांत जर युद्धाचा तणाव कमी झाला नाही, तर सोन्याचा भाव २ लाखांचा टप्पा सहज ओलांडेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

VIDEO: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला मारहाण.. कपडे फाडले, लाथा घातल्या; सुरक्षा रक्षकाचा प्रताप

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com