- सोनं आणि चांदीचा आजचा दर किती आहे ?
- चांदीच्या किंमतीत मोठी वाढ
- सोन्याचे दर वाढले की कमी झाले ?
नागपूरच्या सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये (Gold Silver Rate on 4th February 2026) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 3 फेब्रुवारीच्या तुलनेत 4 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात प्रति तोळा Standard दरात (Gold Price Today) तब्बल 9,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरातही (Silver Rate Today) मोठी झेप पाहायला मिळाली आहे. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता असलेले दर आणि 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजताच्या दरांची तुलना केली असता, ग्राहकांना आता दागिने खरेदीसाठी खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे.
नक्की वाचा: बजेटमध्ये घोषीत केलेलं SHE-Marts काय आहे? कुणाला अन् कसा होणार फायदा?
आज सोनं खरेदी दर किती आहे ?
सोन्याच्या विक्री दरात सर्वच कॅरेटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Standard (99.5) सोन्याचे दर 3 फेब्रुवारीला 1,51,300 रुपये होते, ते 4 फेब्रुवारीला 1,60,300 रुपयांवर पोहोचले आहेत. 22K (916) सोन्याचा दर 1,40,700 रुपयांवरून 1,49,100 रुपये झाला आहे. तसेच 18K (750) सोन्याचा दर 1,16,500 रुपयांवरून 1,23,400 रुपये इतका वाढला आहे. 14K आणि 9K सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली असून 14K सोन्याचा दर 97,000 रुपये तर 9K चा दर 64,100 रुपयांवर गेला आहे.
चांदीच्या दरात बंपर उसळी
चांदीच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. शुद्ध चांदीच्या (Bullion) विक्रीचा दर 2,61,600 रुपयांवरून थेट 2,87,100 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच चांदीमध्ये प्रति किलो 25,500 रुपयांची वाढ झाली आहे. दागिन्यांच्या चांदीचा दरही 2,59,000 रुपयांवरून 2,84,300 रुपये झाला आहे. सराफा बाजारात केवळ विक्रीचेच नव्हे, तर खरेदीचे दरही वधारले आहेत. 4 फेब्रुवारी रोजी Standard सोन्याचा खरेदी दर 1,55,500 रुपये निश्चित करण्यात आला आहे, जो 3 फेब्रुवारीला 1,46,800 रुपये होता. चांदीचा खरेदी दरही प्रति किलो 2,78,500 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.