Congress MP Prashant Bhadole Accident: राष्ट्रीय काँग्रेसचे नेते, भंडारा गोंदियाचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. भंडाऱ्यावरून नागपूरकडे जात असताना पडोळे यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसून सुदैवाने खासदार पडोळे सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या फॉर्च्युनर कारचा चक्काचुर झाला आहे.
काँग्रेस खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. आज सोमवारी सकाळी भंडारावरून नागरपूरला जात असताना पडोळे यांच्या फॉर्च्युनर कारला ट्रकने धडक दिली. नागपूरजवळील हल्दीरामसमोर हा अपघात घडला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र खासदारांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.
सध्या दिल्लीमध्ये संसदेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला जाण्यासाठी ते नागपुरकडे निघाले होते. भंडारा नागपूर या महामार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे या मार्गावर यापूर्वीही दोन वेळा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. इथे वारंवार ट्रक अपघात होत असल्याने सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
Satara News: सातारा ZP निवडणुकीचा राडा भोवला! SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; गृह विभागाचे आदेश