NCP Banner Controversy: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अजित पवार यांच्या अपघातानंतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते, असा खळबळजनक खुलासा रोहित पवार यांनी केला होता. यावरुनन वाद सुरु असतानाच रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमातील बॅनरवरुन पक्षाचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार आणि विद्यमान अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना वगळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा रायगडच्या इंदापूर येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातील बॅनरवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. पक्षाचा कार्यक्रम असताना या बॅनरवर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा फोटो लावण्यात न आल्याने राजकारण तापलं आहे. या बॅनरवरुन अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे.
मालकाला अलगद बाजूला सारून जेंव्हा बटाईदारंच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण..
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 29, 2026
जे आम्ही वारंवार बोलतोय.. pic.twitter.com/emp83haYka
रोहित पवारांचेही टीकास्त्र!
“ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जातोय, हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही.राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वत:देव बनण्याचा कुणी प्रयत्न करू नये.महाराष्ट्र हे सहन करणार नाही” अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी सुनील तटकरेंचे नाव न घेता खणखणीत इशारा दिला आहे. तसेच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकारावरुन जोरदार टीका केली आहे. मालकाला अलगद बाजूला सारून जेंव्हा बटाईदारंच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
Trending News: बाप रे! खासगी बसवरील पोस्टरने 2 राज्यात खळबळ, पोलिसांकडून वाहन जप्त; तपास सुरु
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world