प्राध्यापकाच्या जाचामुळे आत्महत्येचा निर्णय; शिक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारी विद्यार्थ्याची सुसाईड नोट

प्राध्यापकाच्या मानसिक छळाला कंटाळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळाफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Gondiya News : प्राध्यापकाच्या मानसिक छळाला कंटाळून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळाफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. 

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या राजस्थान येथील आवेश कुमार नावाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डाॅ. प्रशांत बागडे यांनी विद्यार्थ्याच्या आईबद्दल अपशब्द उच्चारले होते. त्याशिवाय विद्यार्थ्याचा मानसिक छळ केल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.  

Advertisement

विद्यार्थ्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहे. या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.  मात्र, महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Video : 2 मिनिटभर बापाला थोबाडीत मारलं, आई शेजारी बसून मेंदी काढत राहिली; नागपूरमधील संतापजनक दृश्य

सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्याने काय म्हटलंय? 

वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षकांचं वर्तन विद्यार्थ्यांप्रती चांगले असायला हवे. वाटल्यास विद्यार्थ्याला शिक्षा द्यायला काही हरकत नाही. परंतु विद्यार्थ्यांच्या आईवडिलांबाबत अपशब्दाचा वापर करुन मानसिक छळ करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. भविष्यात कुठल्याही विद्यार्थ्यासोबत असा व्यवहार घडू नये असे म्हणत, माझ्या या निर्णयात माझ्या कुठल्याही मित्र मैत्रिणिंचा सहभाग नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. माझ्या आईवडीलांकडे लक्ष द्यावे असंही मुलाने या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. कुसुमाकर घोरपडे यांच्याशी माहिती घेतली. विद्यार्थ्याची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून त्या विद्यार्थ्याने केलेल्या कृत्याची चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे चौकशीअंती नेमका प्रकार समोर येईल. याआधी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Topics mentioned in this article