MSRTC Salary Hike: एसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News! थकबाकी संदर्भात मोठी घोषणा

नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून ही रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

MSRTC News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) हजारो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (अध्यक्ष, एसटी महामंडळ) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या थकबाकी संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला असून ही रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, सन २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना अदा करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. महामंडळाच्या कर्मचारीवर्ग खात्याने दि. ०३ नोव्हेंबर २०२५ रोजी परिपत्रक क्रमांक १९/२०२५ जारी करून थकबाकी वाटपाची कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. या निर्णयामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांची प्रदीर्घ मागणी पूर्ण झाली आहे.

राज्यातील 10 महत्त्वाच्या प्रकल्पांना 'डेडलाईन'; मुंबई मेट्रो 2B आणि पुणे मेट्रो 3 साठी किती मुदत?

थकबाकी वाटप कसे होणार? 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम खालीलप्रमाणे अदा केली जाईल. ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरकाची थकबाकीची रक्कम रु. ५,००१/- ते रु. २५,०००/- पर्यंत आहे, त्यांना ती ५ (पाच) समान हप्त्यांमध्ये अदा करण्यात येईल. तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरकाची थकबाकीची रक्कम रु. २५,००१/- व त्याहून अधिक आहे, ती रक्कम त्यांना ४८ (अठ्ठेचाळीस) समान मासिक हप्त्यांमध्ये अदा केली जाणार आहे. या वाटपाला माहे नोव्हेंबर २०२५ देय डिसेंबर २०२५ च्या वेतन कालावधीपासून सुरुवात होणार आहे.

या परिपत्रकात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही दिलासा देण्यात आला आहे. दिनांक ०१.०४.२०२० नंतर सेवानिवृत्त झालेल्या किंवा अन्य कारणांमुळे सेवेतून कमी झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या मूळ वेतनात झालेल्या वाढीमुळे अनुज्ञेय असलेल्या भविष्य निर्वाह निधी (PF) आणि उपदान (Gratuity) वरील फरकाच्या रकमेची परिगणना करण्यात येऊन, सदर रक्कम विहित कालावधीत त्वरित अदा करावी, असे स्पष्ट निर्देश महामंडळाने दिले आहेत.

Advertisement

Traffic Challans: ट्रॅफिक चलान 50% होईल माफ! कोर्टात न जाता सोपी कायदेशीर पद्धत वापरा

अर्थात, प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या या थकबाकीचा प्रश्न मार्गी लावल्याने एसटी कामगार संघटनांनी समाधान व्यक्त केले असून, या निर्णयामुळे आर्थिक संकटात असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या मान्यतेने हे परिपत्रक तात्काळ अंमलबजावणीसाठी सर्व प्रादेशिक कार्यालये आणि विभाग नियंत्रकांना प्रसारित करण्यात आले आहे