Good News! आता घराबाहेर पडताना छत्री विसरू नका, अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

राज्यात वाढलेल्या उकाड्यामुळे सर्वजण चातकासाठी पावसाची वाट पाहत आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे आज 6 जून रोजी महाराष्ट्रात आगमन झालं आहे. मान्सून कोकणातील रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलक, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचेल अशी माहिती समोर आली आहे. 

मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकरीही सुखावला आहे. हवामान विभागाकडून दहा जूनला महाराष्ट्रात मान्सून प्रवेश करेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यापूर्वीच मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने त्यापूर्वीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यानंतर मान्सूनचं मार्गक्रमण वेगाने होईल. पुढील दोन दिवसात मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

बातमी अपडेट होत आहे.