पश्चिम रेल्वे 13 तासांनंतरही विस्कळीत, वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Palghar Railway Accident: पालघरमधील रेल्वे वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत आहेत

Advertisement
Read Time: 2 mins

- मनोज सातवी, पालघर

Palghar Railway: पालघरमधील रेल्वे वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीतच आहेत. मंगळवारी (28 मे 2024) 5.15 वाजण्याच्या सुमारास मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विरार ते डहाणू अप आणि डाऊन दोन्ही बाजूची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झालाय. लांब पल्ल्यांच्या गाड्या 10 ते 12 तास उशीराने धावत आहेत. या गाड्यांना पालघर ते विरारदरम्यान सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जात आहेत. 

(नक्की वाचा: पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत)

Photo Credit: Reporter-Manjo Satvi

सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण रेल्वे प्रशासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर नीरज वर्मा यांनी रेल्वे रूळाच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई आणि अन्य ठिकाणाहून रेस्क्यू टीमही मागवली आहे.   

प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेकडून जारी करण्यात आलेले हेल्पलाइन क्रमांक

वलसाड :02632241903 / 49453 ऑटो 

उधना : 02267641801    

विरार : 02267639025 

पालघर : 02267649706 / 02267649706/  9004498888

वापी :  02602462341 / 02267649545  / 49545 ऑटो 

सुरत : 02612401797 / 02267641204  / 41204 ऑटो 

वसई रोड :  02267638023

बोईसर : 49720 ऑटो 

डहाणू रोड : 49659 ऑटो  

Advertisement

Goods Train Derails At Palghar | मालगाडी घसरली, ST महामंडळाकडून प्रवाशांसाठी विशेष सोय