- मनोज सातवी, पालघर
Palghar Railway: पालघरमधील रेल्वे वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीतच आहेत. मंगळवारी (28 मे 2024) 5.15 वाजण्याच्या सुमारास मालगाडी रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विरार ते डहाणू अप आणि डाऊन दोन्ही बाजूची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झालाय. लांब पल्ल्यांच्या गाड्या 10 ते 12 तास उशीराने धावत आहेत. या गाड्यांना पालघर ते विरारदरम्यान सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जात आहेत.
(नक्की वाचा: पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी रुळावरुन घसरली, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत)
सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण रेल्वे प्रशासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर नीरज वर्मा यांनी रेल्वे रूळाच्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबई आणि अन्य ठिकाणाहून रेस्क्यू टीमही मागवली आहे.
UP line of Mumbai - Surat section affected due to derailment of wagons of a goods trains at point no 117/118 at Palghar yard at around 1708 hrs. Restoration work is in progress: Western Railway
— ANI (@ANI) May 28, 2024
प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेकडून जारी करण्यात आलेले हेल्पलाइन क्रमांक
वलसाड :02632241903 / 49453 ऑटो
उधना : 02267641801
विरार : 02267639025
पालघर : 02267649706 / 02267649706/ 9004498888
वापी : 02602462341 / 02267649545 / 49545 ऑटो
सुरत : 02612401797 / 02267641204 / 41204 ऑटो
वसई रोड : 02267638023
बोईसर : 49720 ऑटो
डहाणू रोड : 49659 ऑटो
Attention passengers
— DRM - Mumbai Central, WR (@drmbct) May 28, 2024
!!Following are the Helpline numbers for passenger assistance for train updates due to Derailment of Goods train at Palghar yard.
Valsad : 02632241903
49453 Auto
Udhna : 02267641801
Virar :…
Goods Train Derails At Palghar | मालगाडी घसरली, ST महामंडळाकडून प्रवाशांसाठी विशेष सोय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world