जाहिरात

Mumbai News : ऑफिसच्या वेळा बदलणार? लोकलला होणाऱ्या गर्दीच्या धर्तीवर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये येत्या काळात बदल होणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Mumbai News : ऑफिसच्या वेळा बदलणार? लोकलला होणाऱ्या गर्दीच्या धर्तीवर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबईतील लोकलला (Mumbai Local) होणारी गर्दी हा सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. उपनगरातून मोठ्या संख्येने कर्मचारी दररोज मुंबईत नोकरीसाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात आठ प्रवाशांचा हकनाक बळी गेला. याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही पडले. विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले. परिणामी मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (Mumbai office timeing change)

दरम्यान सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये येत्या काळात बदल होणार असल्याची माहिती आहे. यासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्यात याचा अहवाल समोर आल्यानंतर बदल घेतले जाऊ शकतात. 

Mumbai News : मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, भाडेवाढही होणार नाही

नक्की वाचा - Mumbai News : मुंबईतील सर्वच लोकल होणार वातानुकुलीत, भाडेवाढही होणार नाही

रेल्वेकडून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यासाठी विनंती केली होती. याला प्रतिसाद देत राज्य सरकारच्याअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर आणि उपनगरातील कार्यालयातील वेळेत बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com