पुणे जिल्ह्यातील गंभीर वास्तव! ना रस्ता ना सुविधा, आजीला अर्धांगवायूचा झटका; रुग्णालयात नेण्यासाठी 3 किमीची पायपीट

स्वातंत्र्याला 78 वर्षे झाली तरीही भोर तालुक्यातील भाटघर धरण निरादेवघर भागातील दुर्गम डोंगरी गावात, रायरेश्वर किल्ला वरची धानवली अशा अनेक ठिकाणी रस्त्याची सुविधा नाही. 

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे जिल्ह्यातील (Pune District News) भोर या गावात एका वृद्ध महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने डोलीत टाकून तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. भोर तालुक्यातील म्हसर -बुदुक (ता भोर) गावातील शिंदेवस्ती येथील जाईबाई शिंदे या वृद्ध महिलेला सकाळी 9 वाजता पॅरालिसिसचा झटका आला होता. रस्ता नसल्याने महिलेला डोलीत टाकून तीन किलोमीटर चिखल तुडवत पायपीट करीत रुग्णालय गाठावं लागलं. तब्बल दीड तासांनी म्हसरबुद्रुक गावातून खासगी गाडीने भोर रुग्णालयात नेण्यात आले. स्वातंत्र्याला 78 वर्षे झाली तरीही अद्याप दुर्गम डोंगरी गावात रस्त्यांची सुविधा नाही. ही शोकांतिका आहे. 

म्हसरबुदुक गावापासुन सुमारे तीन किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात २५ घरांची शिंदेवस्ती आहे. येथील म्हसर बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य दिनेश बबन शिंदे यांची आजी जाईबाई कोंडीबा शिंदे (वय 90 वर्ष) यांना सकाळी ९ वाजता पॅरेलिसिसचा झटका आला होता. मात्र त्यांच्या गावातील रस्ता कच्चा आहे. पावसाळ्यात वस्तीत कोणत्याही प्रकारची वाहनं येत-जात नसल्याने शिंदेवाडी ते म्हसरबु गावापर्यत तीन किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे नागरिकांनी सदर वृद्ध महिलेला डोलीत ठेवून भर पावसात चिखल तुडवत दीड तासाने गावात आणले. मात्र या गावातही दवाखाना नसल्याने खाजगी गाडीने महिलेला भोर रुग्णालयात नेण्यात आलं.

Advertisement

नक्की वाचा - Solapur: विवाहिता जिवंत तर जळालेला मृतदेह कुणाचा? मंगळवेढ्यात सिनेस्टाईल मृत्यूचा थरार...

    स्वातंत्र्याला 78 वर्षे झाली तरीही तालुक्यातील भाटघर धरण निरादेवघर भागातील दुर्गम डोंगरी गावात, रायरेश्वर किल्ला वरची धानवली अशा अनेक ठिकाणी रस्त्याची सुविधा नाही. त्यामुळे पावसाळ्यात कोणी आजारी पडल्यास, सर्पदंश झाल्यास, महिला प्रसुतीवेळी डाल किंवा डोलीत टाकून पायपीट करत रुग्णाला आणावे लागते. यात रुग्णाचा जीव जाण्याची भीती आहे. मात्र याकडे प्रशासानाचे दुर्लक्ष होत आहे. म्हसरबु येथील शिंदेवस्ती येथे 25 घरे आहेत. येथे कच्चा रस्ता असल्याने दर पावसाळ्यात रस्ता बंद होतो. त्यामुळे पावसाळ्यात दळण-वळणाची सुविधा नाही. त्यामुळे कोणी आजारी पडल्यास रुग्णाला घेऊन पायपीट करावी लागते. 

    Advertisement
    Topics mentioned in this article