Guillain Barre Syndrome : पुण्यात 'जीबीएस' बाधितांची संख्या वाढली, आणखी एका व्हायरसचं नाव आलं समोर

जीबीएस' होण्याचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही, परंतु दूषित पाण्यातील जिवाणूंमुळे याचा प्रसार होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची संख्या वाढली असून, रविवारी आणखी नऊ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण 'जीबीएस' बाधितांची संख्या 158 वर पोहोचली आहे. यामधील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 38 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.  गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) च्या प्रकरणांमध्ये गेल्या तीन आठवड्यांत सातत्याने वाढ होत असून रविवारी आणखी नऊ नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर ही संख्या 158 वर पोहोचली असल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या अहवालात देण्यात आली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

WHO अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने नुकतच शहरातील काही प्रभावित भागांना भेट दिली असून स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांसोबत मिळून आरोग्य कर्मचाऱ्यांना सक्रिय रुग्ण शोधण्यासाठी (Active Case Search) प्रशिक्षण दिलं जात आहे. यामुळे प्रत्येक संशयित रुग्ण ओळखला जाईल, निदान होईल आणि योग्य उपचार मिळतील, याची खात्री केली जात आहे.

WHO जिल्हा आणि राज्य पातळीवरील टीमना तांत्रिक आणि क्षेत्रीय मदत दिली जात आहे. तसेच प्रतिसाद देणाऱ्या तज्ज्ञांना आवश्यक संसाधने, प्रशिक्षण आणि समर्थन प्रणाली प्रदान करत आहे, असं WHO चे भारतातील प्रतिनिधी डॉ. रोडेरिको एच. ऑफ्रिन यांनी निवेदनात म्हटलं आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune news: पुण्यात GBS चा धोका का वाढला? पाणीपुरवठ्यासंदर्भात धक्कादायक अहवाल आला समोर

'नोरोव्हायरस' आढळला
ज्या रुग्णांना 'जीबीएस' झाला आहे, त्यांच्यापैकी 65 रुग्णांच्या शौचाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता, 21 नमुन्यांत (32 टक्के) अतिसाराला कारणीभूत ठरणारा 'नोरोव्हायरस' आढळून आला आहे. 

'जीबीएस' ची कारणे आणि उपाय
'जीबीएस' होण्याचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही, परंतु दूषित पाण्यातील जिवाणूंमुळे याचा प्रसार होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे आणि स्वच्छता बाळगावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

'नोरोव्हायरस' आणि 'जीबीएस'
'नोरोव्हायरस'मुळे 'जीबीएस' होत नसल्याचे पोटविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. 'नोरोव्हायरस' दूषित पाणी, अन्न यापासून होतो. त्याने अतिसार (उलट्या व वारंवार जुलाब) होतो. परंतु, 'जीबीएस' होत नाही. साध्या उपचारांनी तो कमी होतो.

Advertisement