गुजरात: गुजरातच्या बनासकांठा येथे एका महाविद्यालयीन मुलीला ब्लॅकमेल करुन सहा जणांनी 16 महिने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जवळच्याच मित्राने तिचा चोरुन व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग सुरु केले अन् 6 जणांनी त्या तरुणीचे 16 महिने लचके तोडले. नराधमांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून मुलीने पोलिसात धाव घेतली ज्यानंतर सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भयंकर घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी आणि आरोपींमधील एका मुलाची 2023 मध्ये ती पालनपूरच्या कॉलेजमध्ये शिकत असताना इन्टाग्रामवर मैत्री झाली. दोघांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते निर्माण झाले. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये तो मुलगा त्या विद्यार्थ्याला एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी घेऊन गेला. तिथे त्याने विद्यार्थिनीच्या कपड्यांवर इडली सांडली आणि नंतर तिला खराब झालेले कपडे स्वच्छ करण्यासाठी एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे एक खोली घेतली. जेव्हा विद्यार्थिनी तिचे कपडे काढून साफ करत होती, तेव्हा त्या मुलाने तिचा नग्न व्हिडिओ बनवला. तेव्हापासून त्याने ब्लॅकमेलिंग सुरु केले.
(नक्की वाचा- MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा)
मुलीच्या तक्रारीनुसार, मुलाने जाणूनबुजून विद्यार्थिनीच्या कपड्यांवर अन्न सांडले आणि ती स्वच्छ करण्याच्या बहाण्याने तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिचा नग्न व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या इतर सहा मित्रांनाही विद्यार्थिनीवर बलात्कार करायला लावले. ब्लॅकमेल आणि बलात्कारामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीने सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, तर तिने एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.