गुरूपोर्णिमा असल्याने आज पढरपुरमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी रांग पंढरपूरमध्ये दिसत आहे. गुरुपौर्णिमा हा गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. याच दिवशी पंढरपुरात दोन शिष्यांनी आपल्या गुरूच्या आदेशाने विठ्ठल चरणी मोठं दान केलं आहे. हे दान पाहिल्यास अनेकांचे उर भरून आल्या शिवाय राहाणार नाही. शिवाय गुरू शिष्य परंपरेचं एक अनोख उदाहरण या निमित्ताने सर्वांना पाहायला मिळालं आहे.
अतुल पारख आणि गणे आव्हाड हे मुळचे अहिल्यानगर इथले रहिवाशी आहे. आदिनाथ महाराज हे त्यांचे गुरू आहेत. आदिनाथ महाराजांना या दोघांना पंढरपुरच्या विठ्ठलाच्या चरणी चांदीचा दरवाजा अर्पण करा असा आदेश दिला होता. आपली गुरू दक्षिणा म्हणून गुरू पोर्णिमेला तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण करा असा आदेश ही त्यांनी आपल्या शिष्यांना दिला होता. महाराजांनी दिलेला हा आदेश दोन्ही शिष्यांनी लगेचच पाळला.
महाराजांनी दिलेल्या आदेशा नुसार या दोन्ही शिष्यांनी विठ्ठलाच्या चरणी 87 किलो वजनाचा चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे. याची किंमत तब्बल एक कोटीच्या घरात आहेत. विशेष म्हणजे राजस्थानातील उदयपूर येथून हा चांदीचा दरवाजा घडवून आणला आहे. हा राजस्थानात घडवलेला चांदीचा दरवाजा आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरू शिष्याच्या जोडीने विठ्ठल चरणी अर्पण केला. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जाणाऱ्या चौखांबी येथे हा दरवाजा बसवण्यात आला आहे.
यामुळे विठ्ठलाच्या ऐश्वर्यात मोठी भर पडली आहे. या शिष्यांची चर्चा यामुळे पंढरपुरात रंगताना दिसली. मात्र गुरू पौर्णिमे निमित्ताने पुन्हा एकदा गुरू शिष्य ही पंरंपरा अधिरोखीत झाली आहे. गुरू पौर्णिमे निमित्त राज्यभरात वेगवेगळ्या मंदीरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहे. त्यात शिर्डी, अक्कलकोट देवस्थानांचाही समावेश आहे. या ठिकाणी सकाळ पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.