
Guru Purnima 2025 Wishes: प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे महत्त्वाचे स्थान असते. कारण गुरू आपल्याला जीवनातील महत्त्वपूर्ण शिकवण देतात. त्यांच्या शिकवणीमुळे आपण आयुष्यातील कित्येक अडचणी, संकटांवर मात करून यश मिळवतो. गुरू-शिष्याच्या या नात्याची परंपरा पौराणिक काळापासून चालत आलीय. ज्ञानाचे अमूल्य धडे देणाऱ्या अशा गुरूंप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला ‘गुरू पौर्णिमा' (Guru Purnima 2025 Wishes) साजरी केली जाते. तुमच्या जीवनातील गुरूंना खास शुभेच्छा संदेश पाठवून त्यांच्याकडून आशीर्वाद नक्की घ्या.
गुरु पौर्णिमा 2025 च्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Happy Guru Purnima 2025 Wishes)
1. गुरु म्हणजे दीप, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा
जीवनाच्या वाटेवर अडखळत चालताना तुमच्या मार्गदर्शनानेच योग्य दिशा सापडली
गुरुपौर्णिमेच्या या शुभदिनी तुमच्या मार्गदर्शनाबद्दल मनःपूर्वक आभार
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2. गुरु म्हणजे ज्ञानाचा महासागर, प्रेमाचा सागर
जीवनातल्या प्रत्येक वळणावर साथ देणारा विश्वास
अशा गुरूंना मनःपूर्वक गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
3. गुरु हा देव नाही, पण आध्यात्माकडे नेणारा आहे मार्ग
तुमचे शिकवलेले प्रत्येक मूल्य आज आयुष्यात मार्गदर्शक ठरते आहे
गुरुपौर्णिमा शुभेच्छा!
4. जगात अनेक लोक भेटतात, पण गुरु एकच असतो, जो आयुष्य घडवतो
तुमच्या शिकवणुकीमुळेच आज आयुष्यात बरेच काही साध्य करता आलंय
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
5. तुमचं मार्गदर्शन म्हणजे आमचे जीवनपथ
कठीण प्रसंगी दिलेली तुमची शिकवण आठवून आम्ही पुन्हा सावरतो
माझ्या जीवनात अढळ स्थान असलेल्या गुरुंना नमन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
6. गुरु म्हणजे एक असा दीपस्तंभ जो अंधारातून प्रत्येक वाट दाखवतो
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या शिक्षणाची, मार्गदर्शनाची छाया लाभावी हीच प्रार्थना
शुभ गुरुपौर्णिमा 2025!
(नक्की वाचा: Happy Guru Purnima 2025 Wishes: गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप! गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुंना शुभेच्छा पाठवून व्यक्त करा कृतज्ञता)
7. तुमचं शब्दज्ञान आणि तुमचं व्यक्तिमत्त्व
दोन्ही आयुष्यभर आठवतील
गुरू म्हणून तुमचे योगदान आहे अमूल्य
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8. गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या ज्ञानाचा स्त्रोत साजरा करण्याचा दिवस
ज्यांच्यामुळे आयुष्यात प्रकाश निर्माण झाला
अशा माझ्या गुरुंना कोटी कोटी प्रणाम
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
10. गुरू म्हणजे विश्वास
गुरू म्हणजे प्रोत्साहन
गुरू म्हणजे आधार
जीवनातल्या अशा गुरुंसाठी ही गुरुपौर्णिमा समर्पित
शुभ गुरुपौर्णिमा!
11. गुरु हा केवळ शिक्षक नसतो
तर तो जीवनाचे खरे अर्थ शिकवतो
तुमचं हे ऋण कधीच फेडता येणार नाही
तुमच्या कृपाशीर्वादाने आयुष्य उजळो
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Guru Purnima 2025!
(नक्की वाचा:Guru Purnima 2025 Date: गुरुपौर्णिमा कधी आहे, 10 की 11 जुलै? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि उपाय)
12. गुरु म्हणजे पाऊलवाट शोधणारा
अडचणीत साथ देणारा
आणि यशाच्या टप्प्यावर आनंदाने हसणारा
तुमच्यासारखा गुरु लाभणं हे भाग्य आहे
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Guru Purnima 2025!
13. तुमचं हसणं, शिकवणं आणि रागावणं
सर्व काही प्रेरणादायी होतं
तुमच्या आठवणी जीवनभर सोबत राहतील
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Guru Purnima 2025!
14. गुरू हे शिल्पकार असतात
विद्यार्थ्यांचे आयुष्य सुंदर घडवणारे
अशा शिल्पकाराला माझे वंदन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(नक्की वाचा: Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय! समाजात मानसन्मान वाढेल आणि कामात होईल प्रगती)
15. गुरू म्हणजे प्रेरणा
गुरू म्हणजे शिस्त
गुरू म्हणजे दुसऱ्यासाठी असलेली अपार तळमळ
तुमच्यासारखा गुरु लाभणं हीच खरी आयुष्याची श्रीमंती
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Guru Purnima 2025!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world