स्वानंद पाटील, बीड
धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडे यांची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यात आहे. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याची तक्रार करुणा मुंडे यांनी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज (24 फेब्रुवारी) परळी न्यायालयात पार पडणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याबाबतची तक्रार करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
मंत्री धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता.
(नक्की वाचा- Manmad News : लढवय्या नेता हरपला; ठाकरे गटाच्या नेत्याचं अपघाती निधन)
मात्र करुणा शर्मा यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता. त्यांनी ही माहिती दडवल्याबाबत शर्मा यांनी तक्रार केली होती. त्यानंतर न्यायालयाने नोटीस बजावत याबाबतची सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली. आज या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे.