ऐन सणासुदीच्या काळात कुटुंबावर शोककळा, मुलासह आई आणि मामाचाही मृत्यू

माय - लेकासह, भावाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बाणगंगा येथे घडली.

जाहिरात
Read Time: 1 min
नाशिक:

माय - लेकासह, मामाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बाणगंगा येथे घडली. नदीच्या पाण्यात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी मुलाची आई व मामा यांनी नदीत उडी मारली. दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

या दुर्घटनेत पंधरा वर्षीय वाल्मीक विटणरसह अंबादास खरात, इंदुबाई  विटणर यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या काळात खिर्डी गावावर शोककळा पसरली आहे. यानंतर तातडीने मदतकार्य राबवत तीनही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत.
 

Advertisement


Topics mentioned in this article