Mumbai Heat Wave : गेल्या काही दिवसात वातावरणात बदल होत असून उष्णतेचा पारा वाढताना दिसत आहे. मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातही तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यातील चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई आणि ठाण्यातील तापमान जवळपास 38 अशांच्या पार गेलं असून कमाल तापमान सरासरीपेक्षा 5-6 अंश सेल्सिअस अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, तापमानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात तापमानाचा पारा 35.8 अंशापर्यंत पोहोचला असून ठाणे 36.6, सांगली 37.1 अंश सेल्सिअस तर परभणीचा पारा 37 अंशाच्या पार गेला आहे.
पुढील काही दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून यंदा उन्हाळा काही दिवस आधीच सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आज आणि उद्या (25-26 फेब्रुवारी) मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Akola News : शेतामध्येच रोडग्याचा बेत ठरला; चूल पेटवली...धूर झाला अन् एका महिलेने गमावला जीव!
काय काळजी घ्याल
- घराबाहेर पडताना छत्री, पाण्याची बाटली घ्यावी.
- शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं.
- दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळावं.