राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Car Falls Into Shivnadi River : चिपळूण शहरातील भाजी मंडईच्या पाठीमागील रस्त्यावर आज सायंकाळी धक्कादायक घटना घडली. चालक कार रिव्हर्स घेत असताना मोठी दुर्घटना घडली. कार थेट शिवनदी पात्रात शिरल्याचा प्रकार घडला.सुदैवाने नदीपात्रात पाणी कमी होतं. त्यामुळे चालकाला कोणतीही इजा झाली नाही. चालकाने भाजी मंडईच्या मागील बाजूस वाहन गाडी उभी केली होती. खरेदी आटोपल्यानंतर रिव्हर्स घेत असताना वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट नदीपात्रात घुसली. कार अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कारचं मोठं नुकसान, चालक मात्र..
ही घटना सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी,पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने नदीत अडकलेली कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली.नदीतील चिखलामुळे कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
नक्की वाचा >> Pune News: मोशी दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आयुक्तांनी उचललं मोठं पाऊल, 'या' कंपनीला धाडणार नोटिस
नगरपालिकेनं त्या भागातही संरक्षक भिंत उभारावी
चिपळूण नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी शिवनदी पात्रामध्ये संरक्षण भिंत उभारली असून ही भिंत जिथे संपते त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडली.त्यामुळे नदीपात्राच्या पुढील भागातही संरक्षक भिंत उभारण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world