10 hours ago

मुंबईतील कबुतर खान्यांचं भवितव्य आज ठरणार आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी आहे आणि कबुतर खाने कायमचे बंद करायचे की त्यांना दुसरी सोय करायची याचा निर्णय कोर्ट देणार आहे. मात्र कालच्या राड्यानंतर दादरच्या कबुतरखान्याबाहेर पोलिसांची गस्त देखील दिसून येत आहे. 

Aug 07, 2025 21:29 (IST)

Live Update : मुंबई महानगरपालिकेतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना उद्या सुट्टी

नारळी पौर्णिमा सणानिमित्त महाराष्ट्र शासनाने उद्या, शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय / निमशासकीय कार्यालयांना सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. 

यास अनुसरून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयांना देखील उद्या शुक्रवार दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. सबब, अत्यावश्यक सेवा वगळता इतर महानगरपालिका कार्यालये, शाळा इत्यादी बंद राहतील.

Aug 07, 2025 20:17 (IST)

Live Update : विधानभवनात जास्त कडक सुरक्षा केली जाणार

विधानभवनात जास्त कडक सुरक्षा केली जाणार

विधान भवनाच्या राड्यानंतर मंत्रालय प्रमाणे विधान भवनातही बसवली जाणार फेस रेकग्निशन सिस्टिम ? 

विधान भवन मारहाण प्रकरणाचा विशेष अधिकार समितीकडून बुधवारी आढवा घेण्यात आला

यावेळी समितीकडून विधानभवनातही मंत्रालय प्रमाणे फेस रेकग्निशन सिस्टिम बसवता येऊ शकते का ? याबाबतचा अहवाल विधान भवन सुरक्षा यंत्रणेकडून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली

तसेच विधीमंडळात सुरक्षेच्या अनुशंगाने आणखी काय उपाय योजना करणे गरजेचे आहे याबाबतही माहिती मागवल्याची माहिती मिळते

तसेच या प्रकरणात पोलिसांनी आतपर्यंत काय तपास केला, सध्या त्या केसेसचं स्टेटस काय आहे याचीही माहिती विशेष अधिकार समितीने जाणून घेतली

या आढावा बैठकिला विशेष अधिकार समितीचे सदस्यांसह मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस उपायुक्त परिमंडळ १, विधान भवन सुरक्षा पोलिसचे अधिकारी  उपस्थित होते

भविष्यात मंत्रालय प्रमाणे  विधान भवनातही फेस रेकग्निशन सिस्टिम बसवली जाते का हे पाहणं महत्वाचं

Aug 07, 2025 17:10 (IST)

Live Update : भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी...

सोशल मीडियावर रिल्स तयार करून नवनीत राणा यांना गळा कापण्याची आणि जीवाने मारण्याची धमकी....

यापूर्वीही अनेकवेळा नवनीत राणा यांना आले आहे जीवे मारण्याच्या धमक्या..

सध्या अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांच्याकडून तक्रार दाखल करणे सुरू

Aug 07, 2025 14:25 (IST)

Live Update : तब्बल 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाला सुरुवात

तब्बल 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पावसाला सुरुवात

पुणे शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात 

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने घेतली होती विश्रांती 

गेल्या अर्धा तासापासून  पुण्यात पाऊस 

हवामान विभागाकडून पुणे शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट 

अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ

Advertisement
Aug 07, 2025 10:39 (IST)

Live Update : चर्चगेट स्थानकात लोकल ट्रेनला आग, गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे गोंधळ

चर्चगेट स्थानकात लोकल ट्रेनला आग

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील घटना

लोकल उभी असल्याने मोठा अनर्थ ठळला

गर्दीच्या वेळी घडलेल्या घटनेमुळे गोंधळ

Aug 07, 2025 10:10 (IST)

Live Update : पुण्यातील कोथरूड परिसरात एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी

पुण्यातील कोथरूड परिसरात एमआयटी कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी 

विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली, मात्र हाणामारीचा कारण समजू शकले नाही 

सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल 

कोथरूड परिसरातील कॉलेज बाहेरील हा सर्व प्रकार 

कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीमुळे भीतीचं वातावरण

Advertisement
Aug 07, 2025 10:03 (IST)

Live Update : तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला ज्यादा बसेसचे नियोजन

तिसऱ्या श्रावण सोमवारसाठी त्र्यंबकेश्वरला ज्यादा बसेसचे नियोजन 

- दर पाच मिनिटाने त्र्यंबकेश्वरला सोडली जाणार बस 

- दरवर्षी श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरला लाखो भाविक करतात तिसऱ्या सोमवारी गर्दी 

- तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी राज्यभरातील भाविक करतात गर्दी 

- तिसऱ्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर दहा आणि ११ ऑगस्टला भाविकांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नियोजन.

Aug 07, 2025 10:02 (IST)

Live Update : गंगाखेड तालुक्यात रेल्वच्या धडकेत 28 वर्षीय युवकाचा मृत्यू!

रेल्वेच्या धडकेत एका 28 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे, मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान गंगाखेड येथील तुळजाभवानी नगरजवळ आसलेल्या रेल्वे ट्रकवर हि घटना घडली आहे, मयत इसमाचे नाव ज्ञानेश्वर लक्ष्मण इंगळे असून याघटनेची आकस्मिक मृत्यूची नोद गंगाखेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे, ज्ञानेश्वर इंगळे याला रेल्वेचा धक्का लागुन त्याच्या डोक्याला गंभिर इजा झाली अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांनी दिली आसुन मृत्यू देह स्वविच्छदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला होता....

Advertisement
Aug 07, 2025 09:57 (IST)

Live Update : महादेवी हत्तीणीसाठी आज होणारी बैठक पुढे ढकलली

महादेवी हत्तीणीसाठी आज होणारी बैठक पुढे ढकलली 

उद्या दुपारी चार वाजता बैठक 

या बैठकीत फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा होणार आहे

नांदणी मठ, वनतारा आणि राज्यसरकार असा एकत्रितपणे हा न्यायालयीन लढा लढला जाणार आहे

Aug 07, 2025 08:43 (IST)

Live Update : पुणे खराडी ड्रग पार्टी प्रकरण, प्रांजल खेवलकर यांनी केला जामिनासाठी अर्ज

पुणे खराडी ड्रग पार्टी प्रकरण, प्रांजल खेवलकर यांनी केला जामिनासाठी अर्ज

पुणे न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केला आहे

या प्रकरणातील सात ही आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत

Aug 07, 2025 08:34 (IST)

Live Update : 25 हजाराची लाच स्वीकारताना बालविकास प्रकल्प अधिकारी ACB च्या जाळ्यात..

हिंगोलीत महिला व बालकल्याण विकास विभागातील बालविकास प्रकल्प अधिकारी 25 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलाय, विशालसिंह चव्हाण असे या अधिकाऱ्याचे नाव असून अंगणवाडी मदतनीस कर्मचाऱ्यांकडून रुजू अहवाल देण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याने सदरील अंगणवाडी मदतनीसने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे, दरम्यान याप्रकरणी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Aug 07, 2025 08:33 (IST)

Live Update : दहा हजार निराधारांचे रखडले मानधन, वर्ध्यात प्रशासकीय उदासीनतेमुळे लाभापासून वंचित

वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील तब्बल दहा हजार लाभार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून शसनाच्या निराधार योजनेचा नियमित लाभ मिळाला नसल्याची बाब समोर आली आहेय. शासकीय यंत्रनेच्या उदासीनतेमुळे हे मानधन रखडले असल्याची ओरड आहेय.देवळी तालुक्यात संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेचे 6 हजार 737 लाभार्थी गेल्या सहा महिन्यापासून मिळणाऱ्या लाभापासून वंचित आहेय तर  इंदिरा गांधी योजनेचे 4 हजार 750 लाभार्थ्यांना अजूनही लाभ मिळाला नाही

Aug 07, 2025 08:32 (IST)

Live Update : स्वस्त दागिन्यांचे आमिष दाखवून एका महिलेला 30 लाखांचा गंडा

स्वस्त दागिन्यांचे आमिष दाखवून एका महिलेला 30 लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आलीये. 2022 ते 2023 दरम्यान घडलेल्या या घटनेचा जुना राजवाडा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिता सूर्यवंशी यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिलेली. या तक्रारीनंतर जयश्री माजगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Aug 07, 2025 08:32 (IST)

Live Update : शहरात रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनीची छेड, छत्रपती संभाजीनगरातील सलग दुसरी घटना

छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एक अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत तिची शाळेत ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकाने अश्लील कृत्य केल्याची सलग दुसरी घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी रिक्षाचालक संतोष मधुकर ठाकरे याला सिडको पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडे रिक्षा देखील जप्त केली आहे. मुकुंदवाडीत बस चालकाने एका 9 वर्षाच्या मुली सोबत अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याच दिवशी अशीच दुसरी घटना टीव्ही सेंटर भागातील एका इंग्रजी शाळेतील शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत एका रिक्षा चालकाने केल्याच्या समोर आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

Aug 07, 2025 08:31 (IST)

Live Update : मुंबईतील पावसामुळे मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटं उशीराने

मुंबईतील पावसामुळे मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटं उशीराने

Aug 07, 2025 08:17 (IST)

Live Update :विनापरवानगी झाड तोडलं, पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल....

विनापरवानगी झाड तोडलं, पंजाब नॅशनल बँकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल....

सदर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या किंग्ञ्जवे, मोहननगर परिसरातील शाखेतील वडाचे झाड कुठल्याही विनापरवानगी तोडण्यात आली आहे..

मनपाचे अधिकारी अमोल चोरपगार यांच्या तक्रारीवरून बँकेचे मुख्य व्यवस्थापक अभिषेक ददरया व उप मंडळ प्रमुख शैलेंद्र गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 07, 2025 07:46 (IST)

Live Update : भंडाऱ्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, ठिकठिकाणी लहान मोठी झाड कोसळून नुकसान

भंडारा जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान मोहाडी तालुक्यातील भोसा टाकळी व वरठी परिसरात या वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विद्युत खांबांसह ठिकठिकाणी लहान मोठी झाड जमीन दोस्त झाली. तर कारले, दोडके, चवढी च्या बागांना याचा मोठा फटका बसला. या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसान भरपाई ची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Aug 07, 2025 07:40 (IST)

Live Update : महापालिकेच्या निवडणुका नवीन वर्षात?

बीएमसीसह महापालिका निवडणूका २०२६ मध्ये होणार -  सूत्रांची माहिती

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका होणार ?

पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार 

नोव्हेंबर महिन्यानंतर नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणूका होण्याची शक्यता

दोन किंवा तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याची सरकारची तयारी

सूत्रांची माहिती

Aug 07, 2025 07:40 (IST)

Live Update : अजित पवार यांच्या बीड दौराकडे धनंजय मुंडे यांची पाठ

अजित पवार यांच्या बीड दौराकडे धनंजय मुंडे यांची पाठ

अजित पवार आज बीडमध्ये वेगवेगळ्या विषयांवर बैठका घेतल्या, पण मुंडे हे परळीतच थांबले

मुंडे यांनी अजित पवार यांच्या दौराकडे पाठ दाखवल्याचे जोरदार चर्चा - 

मुंडे  नाराजी यामुळे मुंडे अजित पवार याकडे गेले नसल्याची चर्चा

Aug 07, 2025 07:39 (IST)

Live Update : विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला सुरुवात, मोठ्या विश्रांती नंतर पावसाचं आगमन

विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला सुरुवात, मोठ्या विश्रांती नंतर पावसाचं आगमन 

Aug 07, 2025 07:35 (IST)

Live Update : भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन, काय आहे महत्त्वाच्या घोषणा?

वर्धा जिल्ह्यांतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गेल्या सात महिन्यात 84 अपघात झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.सर्वात जास्त फेब्रुवारी मध्ये 23 अपघात तर सर्वात कमी जुन महिन्यात 2 अपघाताचा समावेश आहे.

Aug 07, 2025 07:31 (IST)

Live Update : आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्विकासाबाबत मंत्रालयात बैठक

 मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात मंत्रालयात बैठक पार पडली. राज्याचे गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत सद्यस्थितीत असलेले स्मारक आणि प्रस्तावित नवीन स्मारक यांचा एकत्रित विकास आराखडा समाजकल्याण विभागाने तयार करावा, असे निर्देश देण्यात आले. स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी परिसरातील काही घरांचे व कुटुंबांचे पुनर्वसन करणे गरजेचे असल्याने त्यासाठी पर्यायी जागा शोधावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनास देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक सामाजिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वारसा आहे. त्यामुळे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलण्यावर बैठकीत भर देण्यात आला. 

Topics mentioned in this article