Hingoli News: बापरे! एका फोटोमुळे 60 दिवस इराणच्या जेलमध्ये.. हिंगोलीतील तरुणासोबत काय घडलं?

हिंगोलीमधील तरुणासोबत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इराणमध्ये काढलेल्या एका फोटोमुळे त्याला दोन महिने इराणच्या जेलमध्ये राहावे लागले.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कुलकर्णी, पुणे:  परदेशात फिरायला जाणे, फोटो काढणं प्रत्येकाला आवडतं. भारतातील अनेकांना परदेश सफरीचे, तिथल्या खास निसर्गात फोटोशूट करण्याचे वेड असते. मात्र तुम्हाला माहित आहे का? परदेशात काढलेल्या एका फोटोमुळे तुम्हाला जेलवारीही होऊ शकते. हिंगोलीमधील तरुणासोबत असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला असून इराणमध्ये काढलेल्या एका फोटोमुळे त्याला दोन महिने इराणच्या जेलमध्ये राहावे लागले. काय आहे हे प्रकरण? वाचा... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील अभियंता योगेश पांचाळ यांना इराणमध्ये फोटो काढल्यामुळे अटक होऊन सुमारे दोन महिने तेहरानच्या कारागृहात राहावे लागले. आयात-निर्यात व्यवसायाच्या विस्तारासाठी 5 डिसेंबर 2024 रोजी तेहरानला गेलेल्या योगेश यांचा ७ डिसेंबरनंतर कुटुंबीयांशी संपर्क तुटला होता. नंतर समजले की, तेहरानमध्ये फोटो काढल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. भारतीय दूतावासाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 4 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांची सुटका झाली आणि ते सुखरूप भारतात परतले. 

योगेश पांचाळ यांनी श्रीयोग एक्सपोर्ट नावाची कंपनी स्थापन केली होती आणि तिच्या विस्तारासाठी ते इराणला गेले होते. तेहरानमध्ये फोटो काढून ते कुटुंबीयांना पाठवल्यामुळे त्यांना अटक झाली होती. भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर त्यांची सुटका झाली. त्यांच्या परतीनंतर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आणि फटाके फोडून स्वागत केले. 

नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं

दरम्यान, या घटनेमुळे परदेशात स्थानिक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. विशेषतः इराणसारख्या देशांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी फोटो काढताना किंवा इतर क्रियाकलाप करताना स्थानिक कायद्यांची माहिती घेणे आणि त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement