Hingoli News: पालकांनो काळजी घ्या! मोबाईल गेमचं वेड, हिंगोलीच्या मुलाने थेट हरियाणा गाठलं, पुढे जे घडलं..

ऑनलाइन गेमिंगमधून झालेल्या ओळखीमुळे  सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने थेट हिंगोली सोडून हरियाणा गाठल्याची घटना उघड झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Hingoli News: अल्पवयीन मुला- मुलींना लागलेले मोबाईलचे व्यसन फारच भयंकर आहे. मोबाईल गेमिंगच्या नादाने तीन सख्ख्या बहिणींनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  काही दिवसांपूर्वीच घडली होती. अशीच घटना आता महाराष्ट्रातील हिंगोलीमध्ये घडली आहे. एका ऑनलाईन गेमिंगच्या नादाने हिंगोलीतील एक मुलगा थेट हरियाणाला गेल्याने एकच खळबळ उडाली. हिंगोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेला 16 वर्षीय मुलगा हरियाणातून सुखरूप सापडला. 

हिंगोलीतील मुलगा हरियाणात पोहोचला

लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका, त्यांना ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लावू नका असं नेहमी सांगितले जाते. मोबाईल गेमच्या वाढत्या व्यसनामुळे अल्पवयीन मुलं धोकादायक निर्णय घेत असल्याच्या घटना वाढत आहेत. अशीच एक घटना हिंगोलीत समोर आली आहे. ऑनलाइन गेमिंगमधून झालेल्या ओळखीमुळे  सोळा वर्षाच्या अल्पवयीन तरुणाने थेट हिंगोली सोडून हरियाणा गाठल्याची घटना उघड झाली आहे.

Pune News: खंडाळ्याचा घाट डोकेदुखी बनला, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे पुन्हा जाम झाला; कारण काय?

 हिंगोली जिल्ह्यातील सोळा वर्षीय तरुणाची मोबाईलवर गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली. काही दिवसापासून दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू होता. त्या मित्राने संबंधित तरुणाला हरियाणात येण्यासाठी प्रवृत्त केले. गेमच्या नादात नववीत शिकणारा अल्पवयीन तरुण घरच्या आई-वडिलांना न सांगता थेट हरियाणाकडे निघाला.

पोलिसांच्या सतर्कतेने सुखरुप परतला

आई वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार हिंगोली शहर पोलिसात दिली. हिंगोली पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवताच मुलाचे लोकेशन दिल्ली असल्याचे आढळून आले, त्यानंतर पोलिसांचा संशय अधिकच वाढत गेला.  मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हिंगोली शहर पोलिसांचे रमेश कोरडे राहुल जोगे यांच्या पथकाने हरियाणात जाऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. मुलगा सुखरुप सापडल्याने आई वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

VIDEO: 'अजित दादा अमर रहे..', शिवजयंती उत्सवात मन हेलावणारा क्षण; नाचणारं पब्लिक क्षणात थांबलं अन्...