Tribute To Ajt Pawar In Shivjayanti Viral Video: हिंदवी स्वराज्य संस्थापक, महापराक्रमी राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. देशभरात आज शिवजयंतीचा उत्सव अन् उत्साह पाहायला मिळतोय महाराष्ट्रातील शहरांमध्ये शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी होताना दिसत आहे. शहरांमधील शिवजयंतीच्या मिरवणुकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओने सध्या सर्वांचे लक्ष लेधले आहे, या व्हिडिओमध्ये एका शिवजयंतीच्या मिरवणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्याचे दिसत आहे.
Supriya Sule: सुप्रिया सुळेंना रोहित पवारांची काळजी! राज्य सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाल्या...
शिवजयंतीच्या उत्सवात अजित पवारांची आठवण..
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. सोशल मीडियावर अजित पवार यांना श्रद्धांजली वाहणारे अनेक व्हिडिओ, फोटो माध्यमांवर व्हायरल होत आहेत. सध्या एका शिवजयंतीमध्येही अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
क्षणात सर्व पब्लिक स्तब्ध
नाशिकमध्ये झालेल्या एका शिवजयंतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. डीजेवर माझा आनंद हरपला गाणे लावत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांचा भलामोठा फ्लेक्सही या जयंतीस्थळी लावण्यात आला होता. अजित पवारांसाठी गाणे वाजत असताना सर्व पब्लिक स्तब्ध झाले. अनेकांनी मोबाईल काढून हा भावुक क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.
Sangli Politics: "भाजपची राष्ट्रवादीवर दमदाटी", पाटील विरुद्ध पाटील संघर्ष पेटला, सांगलीत काय घडतंय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world