Hingoli News: लग्न ठरलं, पत्रिका छापल्या, 15 वर्षांच्या मुलीचं धाडस, ते पत्र अन् मोठा धमाका

हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासंदर्भात गावागावात जनजागृतीकरत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • हिंगोली जिल्ह्यातील पंधरा वर्षीय मुलीने तिचा बालविवाह थांबवण्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र लिहिले होते
  • मुलीच्या पत्रामुळे मुख्याध्यापकांनी तत्परतेने बाल संरक्षण समितीला या प्रकरणाची माहिती दिली होती
  • महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईनने मुलीच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
हिंगोली:

समाधान कांबळे

हिंगोली जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने माझं लग्न थांबवा, मला शिकायचे अशी अर्थ हाक एका मुलीने आपल्या  मुख्याध्यापकांना पत्राद्वारे केली. या पत्राची मुख्याध्यापकांनी गांभिर्याने दखल घेतली.  मुख्याध्यापकाच्या तत्परतेमुळे हा बालविवाह ही रोखला गेला आहे. मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात चित्र थोडं वेगळ आहे. ग्रामीण भागात अनेकदा मुलींना मनासारखे शिक्षण घेता येत नाही. मुलगी अल्पवयीन असतानाच अनेकदा लग्न उरकले जातात. अशीच घटना हिंगोलीत समोर आली आहे. पण मुलीच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पण या घटनेमुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.  

हिंगोलीच्या एका पंधरा वर्षीय मुलीचा बालविवाह केला जाणार होता. ती दहाव्या वर्गात शिकते. मात्र तिला शिकायचे होते. तिला लग्न करायचे नव्हते. पण तिचे कुणीही ऐकले नाही. लग्न ठरवलं. पसंती ही झाली. लग्नाच्या पत्रिका छापल्या गेल्या. डोक्यावर अक्षदा पडणारच होत्या. सर्व तयारी झाली होती. पण त्या अल्पवयीन मुलीला ते मान्य नव्हते. तिला शिकायचे होते. मग तिने एक पत्र लिहीले. ते पत्र तिने आपल्या मुख्याध्यापकांना लिहीले. त्यात तिने आपला बालविवाह होत आहे. आपल्याला लग्न करायचे नाहीत. मला शिकायचे आहे. माझं लग्न थांबवा अशी विनंती या मुलीने या पत्रात आपल्या मुख्याध्यापकांना केली होती. 

नक्की वाचा - BMC News: नॉट रिचेबल झालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेविका अखेर सापडल्या, 24 तास कुठे होत्या, ते ही आलं समोर

मला शिकायचं आहे. परंतु घरच्यांनी माझं लग्न 25 वर्षीय मुलाशी ठरवलं आहे. मला आता लग्न करायचं नाही. माझं लग्न थांबवा अशी विनंती तिने या पत्राच्या माध्यमातून मुख्याध्यापकाकडे केली होती. हे पत्र मुख्याध्यापकांना मिळाले. त्यांनी तत्परता दाखवत बाल संरक्षण समितीला हा प्रकार सांगितला.  महिला व बालविकास विभागाच्या चाईल्ड हेल्पलाईनने या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचे समुपदेशन केले गेले. हा बालविवाह आहे. कायद्या विरोधात आहे. असं करू नका. मुलीचे वय लहान आहे. तिला शिकायचे आहे. तिला शिकवा असा सल्ला यावेळी त्या मुलीच्या कुटुंबीयांना बाल संरक्षण समितीने दिला.  

Advertisement

नक्की वाचा - Pune News: चुकलं की हुकलं! सोडतीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये महापौरपदासाठी ट्वीस्ट, मोठी रस्सीखेच

हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासंदर्भात गावागावात जनजागृतीमुळे आणि शिक्षणाच्या गोडीमुळे या मुलीने हे धाडस दाखवला आहे. मुलीने पत्र लिहून केलेल्या धाडसामुळे आणि मुख्याध्यापकाच्या तत्परतेमुळे हिंगोलीत एक बालविवाह रोखला गेला आहे. हिंगोली जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. अनेक ठिकाणी आज ही मुलींचे लग्ना झाले की जबाबदारी संपली अशी भूमीका घेतली जाते. त्यामुळे त्यांच्या मनाचा ही विचार केला जात नाही. उलट त्यांच्या मना विरुद्ध बाल वयातच लग्न लावले जाते. अशीच ही घटना म्हणावी लागेल.