हिवरे बाजारात पाणीटंचाईवर खरातकडून सिद्धपूजा, ओशनोलॉजीचं कौतुक; पोपटराव पवारांचं 18 मिनिटांचं भाषण चर्चेत

Popatrao Pawar On Ashok Kharat : सध्या अटकेनंतर खरातचे कुटुंबीय हिवरे बाजारमध्येच आश्रयाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याला कायदेशीर आणि आर्थिक मदत पुरवण्यात काही स्थानिक पातळीवरील सहकार्य असल्याचेही आरोप होत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Popatrao Pawar On Ashok Kharat : महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणारं अहिल्यानगर येथील हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्या ‘ओशनोलॉजी'ला शास्त्रीय आधार असल्याचा दावा करत धक्कादायक वक्तव्य केले आहे. या व्हिडिओमध्ये पद्मश्री पोपटराव पवार बलात्कारी अशोक खरात यांचं भरभरून कौतुक करत असल्याने अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  या वक्तव्यामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोपटराव पवार यांनी असा दावा केला की, सिंगापूर आणि जपानसारख्या देशांमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ‘ओशनोलॉजी'चा वापर केला जातो. त्यांच्या या विधानावरून अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी सिद्धपूजा...

दरम्यान, कॅप्टन खरात याला बलात्कार प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. या व्हिडिओंमधून त्याचे काही राजकीय आणि प्रशासकीय संबंधही उघड होत असल्याचे दिसत आहे. पोपटराव पवार यांनी सांगितले की, २०११ पासून त्यांचा खरात यांच्याशी संपर्क होता. हिवरे बाजारमध्ये मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने खरात तीन दिवस मुक्कामाला होता. गावात पाणीटंचाई दूर करण्यासाठी खरातांची सिद्धपूजा केल्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. खरातांकडे असलेली विद्या अनादिकाळापासून सुरू आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

Advertisement

नक्की वाचा - रात्रीच्या अंधारात डुलणारा 20 फुटी साप, 2 रुपयांचे चिंचोके ते ओस्नो जल; अशोक खरात भक्तांना कसं गंडवायचा?

सध्या अटकेनंतर खरातचे कुटुंबीय हिवरे बाजारमध्येच आश्रयाला असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याला कायदेशीर आणि आर्थिक मदत पुरवण्यात काही स्थानिक पातळीवरील सहकार्य असल्याचेही आरोप होत आहेत. या सर्व घडामोडींमुळे अंधश्रद्धा विरुद्ध कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑशनो जल काय आहे?

भोंदूबाबा खरात हा व्हायग्रा गोळ्यामिश्रित पाणी पीडितांना द्यायचा. ज्याला तो ओस्नो जल आहे असे सांगायचा. हा भोंदूबाबा अशोक खरात ओश्नो तयार करायचा. श्रावणातले चार सोमवार आणि महाशिवरात्रीला हे ओश्नो प्राशन करायला लावायचा. ओम इशनेश्वरराय नमः हा जप करायला सांगायचा.


पोपटराव पवार नेमकं काय म्हणाले?

परदेशातील पोलीस विभागात ‘ओशनोलॉजी'चा वापर केला जातो. युरोपात चोर पकडण्यासाठी पोलीस ‘ओशनोलॉजी' यंत्रणेचा वापर केला जातो. जगभरात याचा वापर केला जातो मात्र दुर्देवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हटलं जातं. अध्यात्मातदेखील वेगळं असतो. खरात सरांचं नेव्हीमधलं जीवन होतं त्यातून ब्रम्हांड शास्त्र आणि समुद्र शास्त्र याशिवाय ग्रह आणि मानवी शरीर याबरोबरच शरीरात आणि पृथ्वीत किती पाणी आहे याचं संतुलन बिघडलं तर काय होतं याचं मार्गदर्शन येथून मिळालं. 

Advertisement

पोपटराव पवारांकडून स्पष्टीकरण...

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. २०१२ साली हिवरे बाजार येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं होतं. त्याच कामगारांनी खरातांच्या ईशाणेश्वराच्या मंदिराचं काम केलं होतं. त्या काळात अशोक खरात यांच्याशी संबंध आल्याचं सांगत पोपटराव पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  राजकीय किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमानिमित्ताने मी आणि अशोक खरात एकत्र व्यासपीठावर आलेले असू या व्यतिरिक्त अशी भोंदूगिरीशी आमचा दुरान्वये संबंध नाही, अशी प्रतिक्रिया समोर आली आहे.