Dombivli Railway Station Kobra VIDEO: मध्य रेल्वेवरील अत्यंत वर्दळीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात आज एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. स्थानकातील पूर्व बाजूला असलेल्या तिकीट काउंटरच्या खिडकीवर थेट एक भला मोठा नाग फणा काढून बसल्याचे आढळून आले. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे तिकीट काढण्यासाठी उभे असलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला, तर तिकीट खिडकीतील रेल्वे कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच पळापळ झाली.
NEET Result: पेपर फुटीनंतर NEETचा निकाल वादात! उत्तरपत्रिकेत 522 गुण, पण स्कोअर कार्डवर फक्त...
तिकीट काऊंटवर साप.. प्रवाशांची घबराट!
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील रेल्वे तिकीट खिडकीवर नेहमीप्रमाणे प्रवासी लोकलचे तिकीट आणि पास काढण्यासाठी रांगेत उभे होते. त्याच वेळी तिकीट खिडकीच्या आतील भागात अचानक एक मोठा नाग सरपटत आला आणि थेट काउंटरच्या मुख्य खिडकीवर फणा काढून बसला. खिडकीच्या काचेजवळ थेट विषारी नाग आल्याचे पाहताच तिकीट देणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यांनी तात्काळ तेथून सुरक्षित ठिकाणी पळ काढला.
तिकीट खिडकीत नाग आल्याची बातमी स्थानक परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या 'नागराजा'ला पाहण्यासाठी प्रवाशांनी तिकीट काउंटरच्या बाहेर एकच गर्दी केली होती. अनेक प्रवाशांनी या घटनेचे व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. ऐन प्रवासाच्या वेळी तिकीट खिडकी बंद झाल्याने आणि समोरच नाग असल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तात्काळ स्थानिक सर्पमित्रांशी संपर्क साधला आहे. सर्पमित्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत तिकीट काउंटरचे कामकाज तात्पुरते विस्कळीत झाले होते.
Jalgaon Crime: महाराष्ट्र हादरला! नवऱ्याकडून ट्रॅक्टरचे भाडे थकले, 4 नराधमांनी बायकोची अब्रु लुटली