
गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग
आंबोली घाटामध्ये धबधब्याच्या परिसरात गुरुवारी (6 जून 2024) पहाटेच्या सुमारास भलामोठा दगड रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा भलामोठा दगड कोसळून संरक्षक भितीकडे जाऊन स्थिरावला. या प्रकारामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत झालेली नाही.
(नक्की वाचा: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या लिंकवर केले क्लिक आणि बसला लाखो रुपयांचा फटका)
घटना घडल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली, अशी माहिती पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी दिली. दरम्यान ऐन वर्षा पर्यटनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे याचा फटका आंबोलीतील पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर घटनेची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळू नये, याकरिता योग्य त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

(नक्की वाचा: कार चालवताना माजी कुलगुरुंना अटॅक, कोल्हापुरातील रक्तरंजित थरार, Video)
आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सात ते आठ वर्षापूर्वी आंबोली घाटात वारंवार दगड कोसळण्याचा प्रकार सुरू आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गाचा प्रश्न निर्माण होतो. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. पण अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान घाट परिसरात धोकादायक होत असल्यामुळे अशा प्रकारचे दगड कोसळल्याची घटना वारंवार घडत असतात.
(नक्की वाचा: जबरदस्त षट्कार ठोकला अन् जमिनीवर कोसळला, परत उठलाच नाही; अंगावर काटा आणणारा Video)
Kurla Water Crisis | कुर्ल्यात पाणीबाणी, पाण्यासाठी संतप्त महिला रस्स्त्यावर; LBS मार्ग रोखला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world