जाहिरात
This Article is From Jun 03, 2024

जबरदस्त षट्कार ठोकला अन् जमिनीवर कोसळला, परत उठलाच नाही; अंगावर काटा आणणारा Video

क्रिकेट खेळताना एका तरुणाने षट्कार ठोकला. यानंतर तो काही वेळ थांबला अन् खाली कोसळला.

जबरदस्त षट्कार ठोकला अन् जमिनीवर कोसळला, परत उठलाच नाही; अंगावर काटा आणणारा Video

प्रतिनिधी, मनोज सातवी

मीरारोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका खाजगी कंपनीने अंडरआम क्रिकेटचं आयोजन केलं होतं. यावेळी क्रिकेट खेळताना एका तरुणाने षट्कार ठोकला. यानंतर तो काही वेळ थांबला अन् खाली कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणाचं वय 30 च्या जवळपास असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तरुणासोबत नेमकं काय घडलं हे स्पष्ट दिसून येत आहे. 

काशिमीरा परिसरात बॉक्स क्रिकेट खेळताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. तरुण खाली कोसळतानाचा व्हिडियो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. काशीगाव पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. मीरारोड येथे क्रिकेट खेळताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका खासगी कंपनीकडून क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या टीम बनवून क्रिकेट सामने सुरू होते. त्यावेळी या तरुणाने एका चेंडूवर जोरदार षटकार ठोकला. मात्र त्यानंतर तो तरुण जमिनीवर कोसळला. त्यावेळी मैदानावरचे खेळाडू आणि इतरांनी त्याला तातडीने उचलून रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत या तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेने आनंदात सुरू असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर एकच शोककळा पसरली. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: