पंढरपुरातील धनगर उपोषणकर्ते आणि दोन मंत्र्यांमधील चर्चा निष्फळ, उद्या CM एकनाथ शिंदेंसोबत बैठक

गेल्या सहा दिवसापासून पंढरपुरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. सहा धनगर बांधव उपोषणासाठी पंढरपुरात बसले आहेत. आज सरकारमधील दोन मंत्री धनगर समाजाशी चर्चा करण्यासाठी आले होते.

Advertisement
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर 

पंढरपुरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी राज्यव्यापी उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आज मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई पंढरपूरला आले होते. मात्र यावेळी धनगर समाज आणि सरकारमधील मंत्री यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहेत. त्यामुळे आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतचा तोडगा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत होईल. 

गेल्या सहा दिवसापासून पंढरपुरात धनगर समाजाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. सहा धनगर बांधव उपोषणासाठी पंढरपुरात बसले आहेत. आज सरकारमधील दोन मंत्री धनगर समाजाशी चर्चा करण्यासाठी आले होते. यामध्ये धनगर समाजाने आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उद्या मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर धनगर समाजाची आरक्षणाच्या तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आहे. 

मुंबई येथे सह्याद्री अतिगृहावर होणाऱ्या बैठकीस धनगर समाजाचे आठ लोकांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. यामध्ये मुंबईतील बैठकीत सर्व शासकीय विभागांचे सचिव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अॅडव्होकेट जनरल उपस्थित राहतील. याबाबत आज मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांनी उपोषणकर्त्यांना माहिती दिली. 

धनगर बांधवांनी आम्हाला कायदा कळत नाही. आम्हाला फक्त आरक्षणाचे अंतिम प्रमाणपत्र कळते, अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच आम्हाला या सरकारने आरक्षण दिले तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आम्ही आमच्या घरात कायमचे लावू, अशी भूमिका उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी सरकारमधील मंत्र्यांसमोर मांडली.