Harshvardhan Sadgir : 5 वर्षे खूप झटलो, मात्र कुणीच दखल घेतली नाही; डबल महाराष्ट्र केसरी सदगीर अखेर बोलला

जिंकल्यानंतर बोलताना सदगीरने राज्याच्या बड्या नेत्यांचाही उल्लेख केला आणि खंत व्यक्त केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Harshvardhan Sadgir : 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर पार पडली. या कुस्तीस्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरचा बलाढ्य मल्ल महेंद्र गायकवाडवर मात करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला.

पाच वर्षे खूप झटलो, पण नोकरी मिळाली नाही....

२०२० साली महाराष्ट्र केसरी झाल्यावर मला सरकारी नोकरी मिळेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी मी चार ते पाच वर्षे खूप झटलो. मात्र माझी दखल कुणीच घेतली नाही. आता नोकरी नाही मिळाली तरी चालेल. त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब, दादा भुसेंची भेटही घेतली, मात्र मला नोकरी दिली नाही, आता मला नोकरी नको." असं तो म्हणाला. मला हवं ते मिळालं आहे, अशी खंत काल महाराष्ट्र केसरीचा किताब मिळालेल्या हर्षवर्धन सदगीर यांनी व्यक्त केली आहे. सरकारी नोकरी कुणाला नको असते, मात्र कुणाकडून प्रतिसाद मिळत नसेल तर काय करायचं, असा उद्विग्न सवाल सदगीर यांनी विचारलाय. काल २२ मार्च रोजी झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकल्यानंतर आज हर्षवर्धन मानाची गदा घेऊन श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला आणि त्याने दर्शन घेतलं.

Advertisement

नक्की वाचा - Pune News: 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात,CM फडणवीसांनी स्पर्धेकडे फिरवली पाठ, कारण काय?

5 लाख अन् फॉर्च्युनरचा मानकरी.. 


 

दरम्यान, महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सलगीर दोघेही ताकदीचे मल्ल असल्याने या कुस्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिली फेरी 1 - 1 अशी बरोबरीत झाली. दुसऱ्या फेरीत महेंद्र गायकवाडने आघाडी घेतली, मात्र अखेरच्या क्षणात हर्षवर्धनने दमदार पलटवार करत गुण मिळवले, त्यासोबतच हर्षवर्धनने 4-2 अशी आघाडी घेत कुस्ती जिंकली.  महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला ५ लाख रुपये रोख पारितोषिक आणि  फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आले.