IAS Officers Transfer News : गेल्या आठवडाभरापासून प्रशासनाकडून 46 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मार्चनंतर २ एप्रिल रोजी आणि आता ७ एप्रिल रोजी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलींचे आदेश देण्यात आले आहेत.
कोणाची कुठे झाली बदली? पहा सविस्तर यादी (IAS Transfer Maharashtra List- 7 एप्रिल २०२६)
१. राहुल रंजन महिवाल - व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
२. श्वेता सिंघल यांची विशेष निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे.
३. रुचेश जयवंशी (आयएएस:आरआर:२००९) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळ, पुणे येथे बदली करण्यात आली आहे.
४. कन्हूराज बागटे (आयएएस:एससीएस:२०११) यांची सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, कल्याण येथे बदली करण्यात आली आहे.
५. लक्ष्मण राऊत (आयएएस:एससीएस:२०१५), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
६. गीतांजली बाविस्कर (आयएएस:एससीएस:२०१५), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ, मुंबई यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
७. दिलीप जगदाळे (आयएएस:एससीएस:२०१५), सह व्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कॉम, कल्याण यांची सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
८. पंकज देवरे (आयएएस:एससीएस:२०१६) यांची सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे बदली झाली आहे.
9. मीनल करनवाल (IAS:RR:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. करिश्मा नायर (IAS:RR:2021) अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
11. अमित रंजन (IAS:RR:2022) प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची अतिरिक्त महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२ एप्रिल रोजी २५ IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश...
1. जी. श्रीकांत : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जी. श्रीकांत यांची आता नवी मुंबईतील जल जीवन मिशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2. दिलीप स्वामी : छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची बदली अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी झाली आहे.
3. वर्षा ठाकूर-घुगे : लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची मुंबईतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
4. दीपक सिंगला : पीएमआरडीए, पुणे येथील अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला यांची नागपूर येथील मनरेगा आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
5. के. मंजुलक्ष्मी : कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांची पुणे येथील पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
6. डॉ. राजेंद्र भारूड : मुंबईतील उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रकल्प संचालक डॉ. राजेंद्र भारूड यांची कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती झाली आहे.
7. डॉ. प्रवीणकुमार देवरे : पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे.
8. डॉ. भरत बास्टेवाड : नागपूर येथील मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड यांची लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
9. वर्षा लड्डा : पुणे येथील कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा यांची अमरावती महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अमोल येडगे : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्त पदी बदली झाली आहे.
11. डॉ. विजय राठोड : एमआयडीसी, मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांची कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. विनय गौडा जी.सी. : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची आता छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
13. डॉ. किरण पाटील : बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
14. डॉ. मंगेश गोंदावले : एमआयडीसी, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.
15. कुमार आशीर्वाद : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी वर्णी लागली आहे.
16. वसुमना पंत : नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
17. प्रजित नायर : गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली आहे.
18. अंकित : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
19. कार्तिकेयन एस. : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.
20. संजीता महापात्रा : अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांची सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
21. मिन्नू पी. एम. : जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.
22. सत्यम गांधी : सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
23. जस्मिन : रत्नागिरीतील राजापूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी जस्मिन यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.
24. अंजली शर्मा : अंजली शर्मा यांची जालना महापालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
25. कृष्णकांत कनवारिया : नंदुरबारमधील शहाद्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनवारिया यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
३१ मार्च रोजी १० IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश...
१. लोकेश चंद्र (आयएएस:आरआर:१९९३), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
२. अश्विनी भिडे (आयएएस:आरआर:१९९५), मुख्यमंत्री यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांची महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
३. विकास चंद्र रस्तोगी (आयएएस:आरआर:१९९५), अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी), कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.
४. विनिता वैद सिंघल (आयएएस:आरआर:१९९६), प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि पुनर्विकास, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
5. परिमल सिंग (IAS:RR:2004) प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई यांची सचिव (कृषी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई.
6. तुकाराम मुंढे (IAS:RR:2005) सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव, आपत्ती व्यवस्थापन, R&R, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
7. लहू माळी (IAS:SCS:2009) यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.
9. प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:2010) सह आयुक्त, राज्य कर, मुंबई यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. पृथ्वीराज बी पी (IAS:RR:2014) अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची महापालिका आयुक्त, वसई विरार महानगरपालिका, विरार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे