जाहिरात

तुकाराम मुंढेंची 21 वर्षात 24 वी बदली; महाराष्ट्रातील 10 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली, कोणाला कुठे संधी?

तुकाराम मुंढे, अश्विनी भिडे यांच्यासह महाराष्ट्रातील १० बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली सध्या चर्चेत आहे.

तुकाराम मुंढेंची 21 वर्षात 24 वी बदली; महाराष्ट्रातील 10 बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली, कोणाला कुठे संधी?

Transfer of IAS Officers : IAS अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आल्यासह राज्यातील बड्या १० IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.  यामध्ये तुकाराम मुंढे यांचंही नाव आहे. विशेष म्हणजे त्यांची ही २४ वी बदली असेल. २१ वर्षात त्यांची २४ वी बदली करण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची असंघटीत कामगार आयुक्त पदावरुन दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली होती. आता त्यांची आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. 

२१ वर्षात तुकाराम मुंढे यांची २४ वेळा बदली...

  1. ऑगस्ट 2005 - प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
  2. सप्टेंबर 2007 - उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
  3. जानेवारी 2008 - सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
  4. मार्च 2009 - आयुक्त, आदिवासी विभाग.
  5. जुलै 2009 - सीईओ, वाशिम.
  6. जून 2010 - सीईओ, कल्याण.
  7. जून 2011 - जिल्हाधिकारी, जालना.
  8. सप्टेंबर 2012 - विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
  9. नोव्हेंबर 2014 - सोलापूर जिल्हाधिकारी.
  10. मे 2016 - आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
  11. मार्च 2017 - मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
  12. फेब्रुवारी 2018 - आयुक्त, नाशिक महापालिका.
  13. नोव्हेंबर 2018 - सहसचिव, नियोजन.
  14. डिसेंबर 2018 - प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
  15. जानेवारी 2020 - आयुक्त, नागपूर महापालिका.
  16. ऑगस्ट 2020 - सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
  17. जानेवारी 2021 - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
  18. सप्टेंबर 2022 - आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
  19. एप्रिल 2023 - सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास 
  20. जून 2023 - सचिव मराठी भाषा विभाग
  21. जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
  22. जून 2024 - असंघटित कामगार विभाग
  23. ऑगस्ट 2025 - दिव्यांग कल्याण विभाग
  24. मार्च 2026 - आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभाग

नक्की वाचा - Ashwini Bhide: मुंबई महापालिकेचा 150 वर्षांचा इतिहास बदलणाऱ्या अश्विनी भिडे कोण आहेत? 'या' मोठ्या कामामुळे ओळख

तुकाराम मुंढे यांच्याशिवाय आणखी १० IAS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे, जाणून घेऊया कुणाची कुठे झाली बदली...

१० IAS अधिकाऱ्यांची बदली...

१. लोकेश चंद्र (आयएएस:आरआर:१९९३), अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. यांची मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

२. अश्विनी भिडे (आयएएस:आरआर:१९९५), मुख्यमंत्री यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांची महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

३. विकास चंद्र रस्तोगी (आयएएस:आरआर:१९९५), अतिरिक्त मुख्य सचिव (कृषी), कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

४. विनिता वैद सिंघल (आयएएस:आरआर:१९९६), प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि पुनर्विकास, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.

5. परिमल सिंग (IAS:RR:2004) प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई यांची सचिव (कृषी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई.

6. तुकाराम मुंढे (IAS:RR:2005) सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सचिव, आपत्ती व्यवस्थापन, R&R, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

7. लहू माळी (IAS:SCS:2009) यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वासन प्रकल्प लिमिटेड मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. माणिक गुरसाल (IAS:SCS:2009) यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

9. प्रेरणा देशभ्रतार (IAS:RR:2010) सह आयुक्त, राज्य कर, मुंबई यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. पृथ्वीराज बी पी (IAS:RR:2014) अतिरिक्त महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांची महापालिका आयुक्त, वसई विरार महानगरपालिका, विरार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com