98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं, तर गल्ला गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेंना दिल्याचा गंभीर आरोप नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात केला आहे.
त्यांच्या या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात पडसाद पडत आहे. यावर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नीलम गोऱ्हे यांची साहित्य संमेलनात मुलाखत घेण्याचं कारण काय, असा सवाल उपस्थित केला आहे.
नक्की वाचा - NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसची राज्याबाहेर मोर्चे बांधणी, वेगळी चुल की भाजपला साथ?
साहित्य संमेलनात साहित्यिक म्हणून नीलम गोऱ्हेंची मुलाखत का घेण्यात आली? त्यांचं साहित्यातील योगदान काय असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. नीलम गोऱ्हे मातोश्रीवर नेहमी पडीक असायचे. मातोश्रीवर कोणाला सोडायचं कोणाला बाहेर ठेवायचं हे काम नीलम गोऱ्हे करीत होत्या. त्यांना येथील आर्थिक व्यवहार अधिक माहिती आहे. त्यांनी इतके पैसे कुठे ठेवले आहेत? त्यांचे परदेशातही खाती असतील असा धक्कादायक आरोपी अंधारे यांनी केला आहे. कदाचित तेथील आर्थिक व्यवहाराच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोऱ्हेच असतील, असंही त्या पुढे म्हणाल्या.