IMD Forecast : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज 22 जुलै रोजी सकाळी 7.10 वाजता पावसाचा इशारा जारी केला आहे. या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील 3-4 तासांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. हा इशारा स्थानिक पातळीवरील हवामानातील बदलांवर आधारित असून, नागरिकांनी त्यानुसार तयारी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Mumbai Air Quality Report: मायानगरी मुंबईची हवा शुद्ध, प्रदूषण पातळीत 44 टक्क्यांनी घट, वाचा रिपोर्ट)
पालघर आणि ठाणे मुंबईला लागून असलेल्या या जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळेत पाऊस झाल्यास जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. मुंबई येणाऱ्या नागरिकांना ऐन गर्दीच्या वेळेत त्रास सहन करावा लागू शकतो.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणातील हे जिल्हे पावसासाठी आधीच संवेदनशील आहेत. हलक्या ते मध्यम पावसामुळे येथील नद्यांच्या पाणी पातळीत किरकोळ वाढ होऊ शकते., तसेच सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(नक्की वाचा - Skin Care : त्वचेच्या काळजीसाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना फॉलो करावं का? तज्ज्ञांनी सांगितलं...)
हवामान विभागाने हा इशारा जारी केल्यामुळे, नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसापासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही आपल्या शेतीशी संबंधित कामांचे नियोजन करताना या पावसाचा विचार करावा.
तात्पुरत्या आणि स्थानिक स्वरूपाच्या हवामानातील बदलांसाठी हा हवामानाचा इशारा दिला जातो, ज्यामुळे नागरिकांना त्वरित तयारी करण्याची संधी मिळते. सध्या, मुंबई शहरासाठी थेट मोठ्या पावसाचा कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.