Maharashtra IMD Rain Alert: राज्यात पावसाचा जोर ओसरलेला असतानाच, आता पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार मुसंडी मारली आहे. हवामान विभागाने (IMD) १९ जुलै ते २३ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीसाठी पावसाचा नवा अंदाज वर्तवला असून, राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Shivsena News: ठाकरेंच्या बंडखोर खासदार गटाचे शिवसेनेत विलिनीकरण, लोकसभा अध्यक्षांनी दिली मान्यता
राज्यात पावसाची पुन्हा एन्ट्री, पुढील 5 दिवस महत्त्वाचे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. १९ जुलै रोजी कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसाचा हा सक्रिय टप्पा जनजीवन प्रभावित करू शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानतज्ज्ञांनी केले आहे.
विशेष म्हणजे, आज १९ जुलैसाठी राज्यातील १६ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. यामध्ये अहिल्यानगर, पुणे, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबईतही ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कमाल आणि किमान तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.