उद्धव ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर होते. आयोध्येत राम मंदिरात झालेल्या दान चोरीचा निषेध करण्यासाठी त्यांनी इथं रामरक्षा आंदोलन ही केलं. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या नागपूर दौऱ्याच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरे हे अनेक वेळा नागपूर दौऱ्यावर आले होते. पण त्यांचा 1969 सालाचा नागपूर दौरा हा कधी ही न विसरणार आहे. त्या दौऱ्यात जे काही घडलं त्याने शिवसेना आणि शिवसैनिक काय आहेत हे संपूर्ण राज्याला समजलं होतं. या दौऱ्यात चक्का बाळासाहेब ठाकरेंवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तो सतर्क शिवसैनिकांनी कसा उधळला होता त्याची चर्चा या दौऱ्या निमित्ताने होत आहे.
बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या विस्तारासाठी राज्य पिंजून काढत होते. तो काळ शिवसेनेच्या संघटन बांधणीचा होता. पक्ष वाढवण्यासाठी बाळासाहेबांनी विशेष मोहीमच हाती घेतली होती. 1969 सालची ही गोष्ट आहे. त्यावेळी बाळासाहेब हे नागपूर दौऱ्यावर आले होते. तिथे त्यांची सभा होती. सभा झाल्यानंतर बाळासाहेबांना तातडीने मुंबईला ही जायचं होतं. त्यामुळे तशी तयारी ही करण्यात आली होती. सभेनंतर बाळासाहेब नागपूरच्या विमानतळावर पोहोचले. त्यावेळी रात्रीचे जवळपास दिड वाजले होते. बाळासाहेबांसोबत त्यावेळी तिन चार शिवसैनिक होते.
विमानतळावर त्यावेळी बाळासाहेबांनी एक पुस्तक ही विकत घेतलं. त्यानंतर ते वाचनात गुंग झाले. त्याचवेळी एक शिवसैनिक त्यांच्याकडे धावत पळत आला. त्यावेळी नागपूरात लालभाई गँगचा दबदबा होता. त्या शिवसैनिकाने बाळासाहेबांना सांगितले की लालभाई गँगचे गुंड तुमच्यावर पाळत ठेवून आहेत. तुमचा पाठलाग करत गँगमधली नायडू, चौबे, यादव, पाटील हे गुंड विमानतळात आले आहेत असं सांगितलं. बाळासाहेबांनी विलंब न करता ही माहिती उपस्थित पोलिस अधिकाऱ्याला दिली. हे करत असतानाच टोळीतील गुंड बाळासाहेबांच्या जवळ आले.
त्यातील नायडू या गुंडाने बाळासाहेबांसोबत चर्चा करायची आहे असं सांगितलं. त्यावर याला चर्चा करायची नाही. याच्या मनात काही तरी वेगळे सुरू आहे याची कल्पना बाळासाहेबांना आली. त्यांनी लागलीच कोणती ही चर्चा आपल्याला करायची नाही असं स्पष्ट केलं. बाळासाहेबांचे असं उत्तर आल्यानंतर नायडू चिडला. येवढा मोठा नेता आणि चर्चा करत नाही, मग आम्हाला आमच्या पद्धतीने चर्चा करावी लागेल असं तो म्हणाला. त्याचवेळी त्याने त्याच्या खिशात काही तरी काढण्यासाठी हात घातला. त्याच वेळी बाळासाहेबांनी त्याला दणका दिला. इतर शिवसैनिक ही या गुंडांवर तुटून पडले. सर्व गुंडंना त्यांनी तिथून पिटाळून लावले. बाळासाहेबांवर झालेला हा पहिला हल्ल्याचा प्रयत्न होता. तो हल्ला नागपूरात झाला होता. त्यामुळे हा दौरा ही सतत लक्षात राहीला. खास करून शिवसैनिक काय आहेत हे ही संपूर्ण राज्याला समजले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world