Rain Alert : तळकोकणात पावसाचा यलो अलर्ट; विदर्भ, मराठवाड्यात काय आहे पावसाचा अंदाज?

उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात जळगाव आणि धुळ्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

राज्यातील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.  कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोकणात सर्वत्र पावसाची संततधार सुरु आहे. मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नदी, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. मात्र कोकणातील पावसाचा हा जोर पुढील काही दिवस कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

(नक्की वाचा-  वरळीत हिट अँड रन प्रकरणी शिंदे गटाचा नेता पोलिसांच्या ताब्यात, तर मुलासह दोघांना अटक)

तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि ठाण्यात देखील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  मुंबईत मात्र पुढील काही दिवस मोठा पाऊस अपेक्षित नाही. मुंबईत काही ठिकाणी आज अधूनमधून पावसाच्या सरी येतील. 

Advertisement

(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील ही ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित; पोलिसांनी जारी केली यादी)

उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात जळगाव आणि धुळ्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.  संपूर्ण विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 

Topics mentioned in this article