राहुल कुलकर्णी, पुणे
पुण्यातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. महिलांच्या दृष्टीने देखील पुणे शहरातील अशी काही ठिकाणे आहेत, जी असुरक्षित मानली जात आहेत. पुणे पोलिसांनीच याबाबत माहिती दिली आहे. पुणे पोलिसांनी शहरातील 165 ठिकाणे शोधून काढली आहेत, जी ठिकाणे वेगवेगळ्या कारणांमुळे महिलांसाठी असुरक्षित आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवाजीनगर, पर्वती, बिबवेवाडी, हडपसर आणि येरवडा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत असलेल्या ठिकाणी ही असुरक्षित ठिकाण आहेत. शहरातील पाच झोनमध्ये सर्वाधिक संवेदनशील 'हॉटस्पॉट' ओळखले गेले आहेत.
(नक्की वाचा- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश)
2015 मध्ये, राज्य सरकारने महिलांची सुरक्षा वाढवण्याचे मार्ग शोधण्यासाठी महिला सुरक्षा समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यांनी ही ठिकाण शोधली आहेत.
या भागांमध्ये रस्ते, बस स्टॅाप अशा वर्दलीच्या ठिकाणी पथदिव्यांची व्यवस्था नाही. उशीरा प्रवास करतात तिथे योग्य ती व्यवस्था नाही. रोड रोमिओंचा वावर याठिकाणी आहे. अवैद्य धंदे देखील या परिसरांमध्ये सुरु आहेत. देशी दारूच्या दुकानांजवळ बस स्टॉप आहेत. अशा विविध कारणांमुळे ही 165 ठिकाणे असुरक्षित मानली जात आहेत.
(नक्की वाचा- बातमी - 'अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत' सुनेत्रा पवारांची इच्छा काय?)
पुण्यातील कोणती ठिकाणे महिलांसाठी असुरक्षित?
- खडकमधील 4 ठिकाणे
- समर्थमधील 6 ठिकाणे
- फरासखानामधील 6 ठिकाणे
- विश्रामबागमधील 4 ठिकाणे
- शिवाजीनगरमधील 11 ठिकाणे
- डेक्कनमधील 5 ठिकाणे
- समितीमधील 2 ठिकाणे
- स्वारगेटमधील 5 ठिकाणे
- लष्करमधील 4 ठिकाणे
- सहकारनगरमधील 6 ठिकाणे
- भारती विद्यापीठमधील 4 ठिकाणे
- बंड गार्डनमधील 5 ठिकाणे
- कोरेगाव पार्कमधील 4 ठिकाणे
- वारजे माळवाडीमधील 2 ठिकाणे
- कोथरूडमधील 2 ठिकाणे
- अलंकारमधील 4 ठिकाणे
- पार्वतीमधील 10 ठिकाणे
- सिंहगड रोडमधील 4 ठिकाणे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world