Maharashtra Budget Session 2026: मुंबई शहर जिल्ह्यातील मिळकतीच्या फेरफार प्रक्रियेला आता डिजिटल गती मिळाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत निवेदन करत, मुंबईत प्रथमच मिळकतीचे फेरफार ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आल्याची माहिती विधानपरिषदेत दिली.
महसूल मंत्र्यांची घोषणा
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुंबई शहर व उर्वरित महाराष्ट्रातील प्रॉपर्टी कार्ड संगणकीकरणाच्या प्रणाली वेगवेगळ्या असल्यामुळे आतापर्यंत मुंबईत ऑनलाइन फेरफार प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने या प्रक्रियेला गती दिली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील १९ महसूल विभाग व ४ नगर रचना योजनांमधील सुमारे २७,८४७ मिळकती पत्रिका https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Navi Mumbai : नवी मुंबईचा प्रवास आता सुसाट; ठाणे-बेलापूर मार्गावर नो सिग्नल, वाहतूक कोंडीतून सुटका
४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाइन
यासाठी विशेष ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या फेरफार अर्ज करता येणार आहेत. अर्जाची स्थितीही ऑनलाइन तपासता येणार असल्यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यामध्ये खरेदीखत, वारसा, बक्षीसपत्र, भाडेपट्टा, गहाणखत, रोड सेटबॅक, आरक्षण आणि भूसंपादन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना होणार आहे.मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे हा उपक्रम राबविल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
महिलांना ओळखीच्या व्यक्तींकडूनच सर्वाधिक धोका? राज्यातील बलात्काराची धक्कादायक आकडेवारी समोर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world