Atrocities against women in Maharashtra : महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराचा धक्कादायक घटना वारंवार समोर येत आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी प्रसिद्ध केली. यावेळी त्यांनी दिलेली माहिती धक्कादायक होतील.
ओळखीच्या व्यक्तींकडून अत्याचाराचं प्रमाण सर्वाधिक...
महाराष्ट्रातील महिलांवर होणारे सर्वाधिक बलात्कार हे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींकडून केला जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून धोका असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या एकूण बलात्काराच्या 99.31 टक्के प्रकरण ओळखीच्या व्यक्तीकडून होत असल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या काही दिवसात राज्यातील बेपत्ता महिलांची प्रकरण वारंवार समोर येत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकाशझोत टाकला. बेपत्ता महिला प्रकरणात अधिकांश प्रेमप्रकरणं असल्याचं वास्तव आहे. याशिवाय बेपत्ता महिला प्रकरणात ७५ टक्के महिला त्याच वर्षी सापडल्या जातात. हे प्रमाण दोन अडीच वर्षात ९० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. यात ५७ टक्के बेपत्ता होण्याचं कारण प्रेमप्रकरण आहे. यात लव्ह जिहादची काही प्रकरणे आहेत. अपहरणाचे प्रमाण १.८६ टक्के आहे.
महिलांमध्ये पळून जाण्याचे कारणांमध्ये ३८ टक्के प्रेम प्रकरण,३७ टक्के कौटुंबिक आहे. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले बलात्काराचे प्रमाण हे ९९.३१ टक्के आहे. बलात्कार नोंदणीचे प्रमाण वाढत आहे. ९२ टक्के केसेसमध्ये ६० दिवसांत आरोपपत्र दाखल केले जातं असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world