Jasprit Bumrah Record IND Vs ENG Test: टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा इंग्लडमध्ये कहर सुरु आहे.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 'पंजा' घेणारा बुमराह तिसऱ्या कसोटी सामन्यातही पाच विकेट्स घेण्यास यशस्वी झाला आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने टीम इंडियासाठी पहिल्या डावात एकूण 27 षटके टाकली. यामध्ये ७४ धावा देत तो पाच विकेट्स घेण्यास यशस्वी झाला. इंग्लडचा कर्णधार बेन स्टोक्स, जो रूट, हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चरला त्याने बाद केले या उत्कृष्ट कामगिरीसह जसप्रीत बुमराहने तीन मोठे रेकॉर्डही उध्वस्त केले.
IND vs ENG: शुबमन गिल अंपायरवर चिडला, गावस्करही संतापले! लॉर्ड्स टेस्टमध्ये भर मैदानात मोठा राडा
जसप्रीत बुमराहचे 3 मोठे रेकॉर्ड!
परदेशात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स
जसप्रीत बुमराह परदेशी भूमीवर सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, ही मोठी कामगिरी माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर नोंदली गेली होती. त्यांनी परदेशी भूमीवर 12 वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. पण काल लॉर्ड्सवर पाच विकेट घेताच बुमराहच्या नावावर हा विक्रम जोडला गेला आहे. कालच्या दिवसअखेर त्याने टीम इंडियासाठी परदेशी भूमीवर ३४ सामने खेळताना १३ वेळा पाच विकेट घेतल्या आहेत. या दोन दिग्गजांनंतर माजी खेळाडू अनिल कुंबळे (१० वेळा) आणि इशांत शर्मा (९ वेळा) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
सेना देशांमध्ये सर्वाधिक वेळा पाच विकेट्स
एवढेच नाही तर, बुमराह SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सहभागी होताना सर्वाधिक पाच विकेट घेणारा पहिला आशियाई गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे, त्याने माजी पाकिस्तानी कर्णधार वसीम अक्रमची बरोबरी केली आहे. जसप्रीत बुमराह आणि वसीम अक्रम यांनी आशियाई गोलंदाज म्हणून SENA देशांमध्ये 11 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (10 वेळा) आणि माजी पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान (८ वेळा) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
(नक्की वाचा: Shubhman Gill: एक सामना अन् 5 महारेकॉर्ड मोडण्याची संधी! कर्णधार शुभमन गिल रचणार नवा इतिहास )
तसेच इंग्लंडमध्ये खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी फक्त काही भारतीय गोलंदाजांच्या नावावर आहे. जसप्रीत बुमराहचे नाव आता या यादीत समाविष्ट झाले आहे. भारताकडून इंग्लंडमध्ये कसोटी खेळताना लाला अमरनाथ, सुरेंद्रनाथ, चेतन शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि आता जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोनदा पाच बळी घेण्याची कामगिरी केली आहे.