Mumbai Travelator: देशातील पहिला ट्रॅव्हलेटर पूल मुंबईत! मेट्रो-मोनो-रेल्वेला जोडणार; कसा होणार फायदा? वाचा..

दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मुंबई मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. अखंड मल्टिमॉडल जोडणीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही मोठी चालना मिळेल. 

जाहिरात
Read Time: 2 mins

India's first travelator skywalk: भारतातील पहिला पादचारी पुलावरील ट्रॅव्हलेटर्स एमएमआरडीएकडून  महालक्ष्मी येथे तयार करण्यात आलेला आहे. याचे 90 टक्के काम सध्या पूर्ण झाले आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानक, मेट्रो-३ स्थानक आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक यांना एकाच स्कायवॉकने जोडले जाणार कस काय वॉक वर हा ट्रॅव्हलेटर्स  तयार करण्यात आलेला आहे. हा एकात्मिक इंटरचेंज मार्ग सुरु झाल्यानंतर स्थानकांदरम्यान बदलण्यासाठी लागणारा वेळ सुमारे 20 मिनिटांनी कमी होईल. तसेच दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातून मुंबई मोनोरेलपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. अखंड मल्टिमॉडल जोडणीमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरालाही मोठी चालना मिळेल. काय आहेत या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये?  कसा होईल फायदा? वाचा सविस्तर.. 

काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये? 

  • महालक्ष्मी रेल्वे स्थानक, मेट्रो-३ स्थानक आणि संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक यांना एकाच स्कायवॉकने जोडले जाणार.
  • प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • स्कायवॉकची लांबी २८३ मीटर आणि रुंदी ११ मीटर आहे.
  • यामध्ये ६ ट्रॅव्हलेटर असून त्यांची एकत्रित लांबी १७६ मीटर आहे, तसेच २ प्रवासी लिफ्ट उभारण्यात आल्या आहेत.
  • ताशी सुमारे ४,५०० प्रवासी या स्कायवॉकचा वापर करू शकतील.
  • या प्रकल्पामुळे विविध वाहतूक व्यवस्थांमधील बदलासाठी लागणारा वेळ सुमारे २० मिनिटांनी कमी होणार आहे.
    Kalyan VIDEO: मदतीस गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला! मद्यधुंद तरुणाने जे केलं.. शॉकिंग CCTV फुटेज

प्रवाशांना कसा होणार फायदा? 

  • मेट्रो, मोनोरेल आणि उपनगरीय रेल्वे यांच्यातील प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल.
  • ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.
  • दक्षिण मुंबई आणि वरळी परिसरातील प्रवाशांना मोनोरेलचा वापर अधिक सोपा होईल.
  • सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होईल

Rohit Pawar: एका पेपरचे 12 लाख, बार्शी कनेक्शन.. MPSCचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं सांगितलं