Kalyan Police Man Attack VIDEO: मद्यधुंद तरुणाने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात घटडलेल्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा भागात राहुल तायडे नावाचा मद्यधुंद तरुण गोंधळ घालत होता. दारुच्या नशेत तो नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तक्रार मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले.
Police Attack Video | कल्याणमध्ये पोलिसावर मद्यधुंद तरुणाचा काठीने हल्ला#KalyanNews #KhadakpadaPolice #PoliceAttack #CCTVFootage #CrimeNews #KalyanCrime #MaharashtraNews #BreakingNews #TrendingNews #ViralVideo pic.twitter.com/pIwzBlUgZ4
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 27, 2026
यावेळी राहुल तायडे नावाच्या तरुणाने त्यांच्यावरही हल्ला चढवला. त्याने पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. काठीने हल्ला करत मारहाण केली. या प्रकारात खडकपाडा पोलिसांनी राहुल तायडे विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे मात्र घटनेच्या सीसीटीव्ही सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
Rohit Pawar: एका पेपरचे 12 लाख, बार्शी कनेक्शन.. MPSCचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं सांगितलं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world