Shirdi News : इंदुरीकर महाराजाचा जावई चर्चेत; लाखोंच्या कारवरील 'ते' स्टिकर्सपाहून अनेकांनी भुवया उंचावल्या!

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना साहिल चिलप आणि ज्ञानेश्वरी यांनी नव्या गाडीची पूजा करतानाचा व्हिडिओ शेअर केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनील दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना साधेपणाचे सल्ले देणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराजावर लेकीच्या भव्य लग्नसोहळ्यामुळे टीकेचा सामना करावा लागला होता. आता पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांचा जावई त्यांनी खरेदी केलेल्या नव्या कारमुळे चर्चेत आहे.

इंदुरीकर महाराजांच्या लेकीचं कुटुंब पुन्हा चर्चेत...

३ मे २०२६ रोजी कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिने साहिल चिलप यांच्याशी लग्नगाठ बांधली. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात हा विवाह सोहळा पार पडला. या लग्नाचे भव्यत्व इतके मोठे होते की, तब्बल 100 एकर परिसरात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा दोघांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हिडिओमुळे आता सोशल मीडियावर प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना साहिल चिलप आणि ज्ञानेश्वरी यांनी नव्या गाडीची पूजा करतानाचा व्हिडिओ शेअर केला. या जोडप्यान महागडी फॉर्च्युनर कार खरेदी केली आहे. या गाडीवर लावण्यात आलेल्या “VVIP” आणि “MP अशा स्टिकरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Advertisement

नक्की वाचा - 'भांडी घासण्यापेक्षा रिक्षा चालवणं...'; महिला रिक्षाचालकाचे विचार लाखोंच्या मला भिडले, पुढे तर म्हणाली...

गाडीवर खासदार असल्याचा उल्लेख का?

विशेष म्हणजे, साहिल चिलप खासदार नसताना गाडीवर खासदार असल्याचा उल्लेख असलेला लोगो नेमका का लावण्यात आला? ही गाडी एखाद्या खासदाराच्या वापरात आहे का? किंवा कुणा लोकप्रतिनिधींशी त्यांचा संबंध आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. संबंधित गाडी डिसेंबर महिन्यात खरेदी केल्याचा उल्लेख स्वतः साहिल चिलप यांनी सोशल मीडियावर केला आहे. मात्र त्यानंतर गाडीवर VVIP आणि MP चे स्टिकर झळकू लागल्याने आता या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे..